• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अकोल्यात 1000 किलो पोहे एकाच वेळी बनविण्याचा विक्रम
  • VIDEO : अकोल्यात 1000 किलो पोहे एकाच वेळी बनविण्याचा विक्रम

    News18 Lokmat | Published On: Dec 29, 2018 11:53 PM IST | Updated On: Dec 30, 2018 12:11 AM IST

    अकोला, 29 डि सेंबर : नुसतं नाव जरी उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं. विदर्भातील नाश्त्याचा सुप्रसिध्द आणि सर्वमान्य प्रकार म्हणजे पोहे. हेच पोहे आतापर्यंत आपण आठ-पंधरा जणांसाठी किंवा एखाद्या समारंभात तिनशे-चारशे लोकांसाठी केल्याचे ऐकले-बघीतले असतील. पण अकोल्यात आयोजित एक चित्रकला स्पर्धेत तब्बल 1000 किलो पोहे एकाच वेळी बनविण्याचा विक्रम आज अकोल्यातील पत्रकार आणि खवय्ये नीरज आवंडेकर यांनी केला. राज्यातला हा पहिलाच विक्रम आहे. अकोल्यातील एका चित्रकलेच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 हजार विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना पुरतील एवढे पोहे एकाचवेळी करण्यात आलेत. यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री यांनाही पोहे बनविण्याचा मोह आवरता आला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून या संदर्भातीली तयारी सुरु होती. दहा बाय दहा फुटाची भव्य कढई, त्यासाठी लागणारे मोठ्ठाले सराटे, पोहे भिजवण्यासाठीचे भांडे आणि इतर साहित्य शहरात जळगाव वरून आणण्यात आले होते. यासाठी लागणारे सर्व साहित्य हे जळगाव वरून आणण्यात आले होते. ज्या कढईत पोहे बनवले त्याच कढईत जळगावमध्ये वांग्याचे भरीत बनविण्याचा विक्रम करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी