मध्यप्रदेश, 24 जुलै : जगात माणुसकी मेली असं म्हटलं जात असलं तरी मुकी जनावरं मात्र यासाठी अपात्र आहे. मुक्या जनावराच्या संवदेनशीलतेचं दृश्य मध्यप्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील ग्राम बलवाडी इथं पाहण्यास मिळालं. विजेच्या धक्क्याने एका वानराचा मृत्यू झाला होता. पण त्याचा मृत्यू हा त्याच्या इतर वानरांना मनाला चटका लावून गेला.त्याच्या सहकारी वानराने त्याला शुद्धीवर आणण्यासाठी आटोकात प्रयत्न केला. कधी तो त्या वानराच्या हार्ट पम्पिंग करून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता तर कधी त्याला वारंवार हलवत होता. आश्चर्याची बाब म्हणजे त्याचे इतर वानरंही त्याच्या मृत्यूमुळे त्या ठिकाणी दोन तास स्तब्ध उभी होती. वानरांची माणुसकी पाहुन ग्रामस्थांच्या मनाला पाझर फुटली. त्यांनी मृत वानराचा अंत्यसंस्कार केला. या अंत्यसंस्काराला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थितीत होते.