• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, हे पाहून नवनीत राणांना कोसळलं रडू
  • VIDEO : काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, हे पाहून नवनीत राणांना कोसळलं रडू

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 07:12 PM IST | Updated On: Apr 15, 2019 07:17 PM IST

    संजय शेंडे, अमरावती,15 एप्रिल : काँग्रेसचा अंतर्गत वाद विकोपाला गेल्यानं आज महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत त्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये पठाण चौक इथं हाणामारी झाल्यानं नवनीत राणा यांना आपला प्रचार अर्ध्यावर सोडून माघारी परतावं लागलं. त्यामुळे तिथून जात असताना राणा यांना रडू कोसळलं. रविवारी सायंकाळी पठाण चौक येथे नवनीत राणा या प्रचारासाठी माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासह पठाण चौक येथे पोहोचल्या. तेव्हा माजी नगरसेवक आसिफ तवक्कल यांनी रावसाहेब शेखावत यांना सोबत का आणलं म्हणून नवनीत राणा यांच्यासोबत वाद घातला. यावेळी ही बाब शेखावत यांचा समर्थक एजाज मामू यांना माहिती कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यामुळे नवनीत राणा यांना रडू कोसळले. शेवटी नवनीत राणा आणि रावसाहेब शेखावत यांना प्रचार अर्ध्यावर सोडून निघून जावे लागले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी