राज्यात थंडीच्या कडाक्यानं उचांक गाठलाय. महाराष्ट्राचं नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये आणि नाशकातही आज पारा चक्क शुन्यावर स्थिरावला. वातावरणात गारठा वाढल्यानं वेण्णा तलाव गोठला आणि पहाटेच्या दवबिंदूंचंही बर्फात रुपांतर झालं. वाई साताऱ्यात तापमान 6 डिग्रीपर्यंत घसरलं. तर सांगलीनं आज थंडीचा 72 वर्षांचा विक्रम मोडलाय. सांगलीत आज 8.6 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झालीय. दरम्यान आजही नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात शीतलहर येईल. मंगळवारी नाशिक जिल्ह्यात गारपीट होईल, अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तविलीय. दरम्यान सोमवारी मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे. मंगळवारीही मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.