• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : अंड्यांची ऑर्डर घेऊन 'तो' चालला होता; अपार्टमेंटच्या गार्डने झाडली गोळी
  • LIVE VIDEO : अंड्यांची ऑर्डर घेऊन 'तो' चालला होता; अपार्टमेंटच्या गार्डने झाडली गोळी

    News18 Lokmat | Published On: Dec 12, 2018 07:41 PM IST | Updated On: Dec 12, 2018 07:41 PM IST

    कानपूर, 12 डिसेंबर : कल्याणपूर भागातील एका अपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी झालेल्या वादात एका युवकाचा मृत्यू झालाय. अपार्टमेंटसमोर अंड्याची गाडी लावणाऱ्या एका युवकावर गार्डने बंदुकीची गोळी झाडली, यात तो युवक जागेवच गतप्राण झाला. ही घटना तेथे लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याच भागातील मकडखेडा झोपडपट्टीत राहणारा 18 वर्षाचा चेतन 'रतन ऑर्बिट' अपार्टमेंटसमोर अंडी विकण्यासाठी गाडी लावायचा. त्या दिवशी त्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तिने चेतनाला फोन करून अंड्यांची ऑर्डर दिली. ती घेऊन तो आत जाणार तेव्हढ्यात अपार्टमेंटच्या गार्डने त्याला हटकलं. त्यावरून त्यांच्या चांगलीच वादावादी झाली. त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. दरम्यान, गार्डने चेतनच्या मानेवर बंदुकीची गोळी झाडली. यात त्याचा जागेवरच जीव गेला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading