• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : स्टुडिओत लागलेल्या आगीतून महाराष्ट्राचे लाडके भाऊजी थोडक्यात बचावले
  • VIDEO : स्टुडिओत लागलेल्या आगीतून महाराष्ट्राचे लाडके भाऊजी थोडक्यात बचावले

    News18 Lokmat | Published On: Jan 5, 2019 04:52 PM IST | Updated On: Jan 5, 2019 07:09 PM IST

    मुंबई, 5 जानेवारी : शिवसेना सचिव आणि अभिनेते आदेश बांदेकर सेटवर लागलेल्या आगीतून थोडक्यात बचावले. चेंबूरमधल्या ट्राँम्बे येथील एस्सार स्टुडियोमध्ये शनिवारी 'झिंग झिंग झिंगाट' या शो चं शुटींग सुरू होतं. दरम्यान, अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने सेटला आग लागली. ही घटना घडली त्यावेळेस आदेश बांदेकर आणि सर्व स्पर्धक मुख्य स्टेजवरच होते. मात्र, आग लागल्याचं लक्षात येताच आदेश बांदेकर यांनी सर्व स्पर्धकांना सुखरुप स्टुडियो बाहेर काढलं. आदेश बांदेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी