मुंबई, 2 जानेवारी : मुंबई पालिकेच्या रुग्णालयात विविध प्रकारच्या तब्बल 101 चाचण्या अवघ्या १०० रुपयांत करता येणार आहेत. ही योजना 'आपली चिकित्सा' या उपक्रमाखाली राबविण्यात येणार आहे. याचा फायदा पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरिबांना होणार आहे. पालिकेची रुग्णालये आणि प्रसूतिगृहांतही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. उद्या स्थायी समिती समोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाणार आहे. यामध्ये चार वर्षांच्या कंत्राटासाठी पूर्व उपनगरांमध्ये 'मेट्रो पॉलिसी हेल्थ केअर लिमिटेड' काम करणार असून यासाठी २६.८६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.