'म्हारी छोरी कम हैं के...'

'म्हारी छोरी कम हैं के...'

  • Share this:

08 फेब्रुवारी : धुळे जिल्ह्यातील नागाव गावात मुलींचा सन्मान वाढवणार धाडसी पाऊल शशिकांत बच्छाव यांनी उचललंय. बच्छाव यांनी आपल्या मोठ्या मुलीच्या लग्नात सुक्या वरात परंपरेला छेद दिलाय. बच्छाव याना दोन मुली आहेत. त्यातील मोठ्या मुलीच्या लग्न समारंभात बच्छाव यांनी नवऱ्या मुलीचा भाऊ म्हणून आपल्या लहान मुलगी प्रियांकाचीच सुक्या म्हणून वरात काढली. एखाद्या नातेवाईकाच्या मुलाची वरात काढण्याऐवजी बच्छाव यांनी मुलीलाच घोड्यावर बसवल्याने सर्वांचा आश्चर्याचा धक्का बसला. सर्वांच्या नजरा घोडयावर बसलेल्या प्रियांकाकडे लागल्या होत्या. मुलगा नसल्याचं दु:ख करण्यापेक्षा बच्छाव यांनी आपल्या मुलीलाच मुलाचा दर्जा दिला. हे दृष्य पाहिल्यावर गावातील महिला आणि समाजबांधवांनी घोड्यावर वरात निघालेल्या प्रियांकाचे औक्षण केलं. नवरीच्या भावाचा दर्जा मुलीलाच दिल्याबद्दल बच्छाव परिवारावर आता शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 12:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading