• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रेलवे स्थानकावर चोर-पोलिसांचा फिल्मीस्टाईल पाठलाग
  • VIDEO : रेलवे स्थानकावर चोर-पोलिसांचा फिल्मीस्टाईल पाठलाग

    News18 Lokmat | Published On: Dec 12, 2018 06:48 PM IST | Updated On: Dec 12, 2018 07:26 PM IST

    मुंबई, 12 डिसेंबर : मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्र रेल्वे स्थानकार एका मोबाइल चोरट्याला रेल्वे पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत पकडलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका चोरट्याने फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात बसलेल्या प्रवाशाचा मोबाईल हिसकला आणि धावत्या गाडीतून उडी घेतली. ही बाब दुसऱ्या फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांच्या नजरेस पडली. त्यांनी रेल्वे रुळ ओलाडला आणि पाठलाग करत मोठ्या शिताफीनं त्या चोरट्याला पकडलं. एखाद्या सिनेमात दाखवतात तसं हे दृश्य होतं. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 18 वर्षीय मोबाइल चोराचं नाव तशरुफ़ अंसारी असं आहे आणि तो मुंब्रा येथलाच रहिवासी असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी