27 मे : नरेंद्र मोदींच्या सरकारचा शपथविंधी दिमाखात पार पडला. सोमवारी दिवसभरच मोदींच्या शपथविधीचं सेलिब्रेशन सगळीकडे सुरू होतं. नरेंद्र मोदींच्या शपथविधीमुळे मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण होतं.अनेक ठिकाणी मोटर सायकल रॅली काढण्यात आल्या.तर कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात भाजप कार्यकर्त्यांनी नमो टी स्टॉल लावला होता. यावेळी शेकडो कोल्हापुरकरांना भाजपच्या वतीने चहाचं वाटप करण्यात आलं. सूर्यास्तानंतर बिंदू चौकात आतषबाजीही करण्यात आली. नागपूरमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके वाजवून आणि ढोल ताशांच्या गजरात मोदींच्या विजयाचं स्वागत केलं. नितीन गडकरींना मंत्रिपद मिळाल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यंानी आनंद व्यक्त केलाय.नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी आरुढ झाल्याबद्दल नागपूरच्या गुजराती समाजानेही आनंद व्यक्त केला आहे. गुजराती भवन येथे रॅली आयोजित करुन गुजराती बांधवानी आनंद व्यक्त केला. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाचा आनंदोत्सव नागपूरमधल्या मुस्लीम बांधवांही साजरा केला. हसनबाग परिसरात मुस्लीम बांधवांनी फटाके वाजवले.तर नाशिकमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोतीचूर लाडू वाटून मोदींच्या शपथविधीचा सोहळा साजरा केला. मोठ्या स्क्रीन लावून शपथविधीच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपणही करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात साखर आणि चहाचं वाटप करुन पुण्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.कोकणात मोदींच्या शपथविधीचं सेलिब्रेशन गुढ्या उभारुन झालं. मुंबई- गोवा हायवेवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुढ्या उभारल्या होत्या. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेताच औरंगाबादमध्येही जल्लोष करण्यात आला. भाजप कार्यालयासमोर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी ढोलच्या तालावर नृत्य केलं. गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, भोपाळ, पाटणा आणि त्रिवेंद्रममध्येही मोदींच्या शपथ विधीचं जंगी सेलिब्रेशन झालं.Follow @ibnlokmattv// !function(d,s,id){var js,fjsd.getElementsByTagName(s)[0],p/^http:/.test(d.location)?http:https;if(!d.getElementById(id)){jsd.createElement(s);js.idid;js.srcp://platform.twitter.com/widgets.js;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, script, twitter-wjs);// ]]>