22 एप्रिल : मतदारांची नावं वगळण्याच्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी राहिल्या. अनेक ठिकाणी चुकून नावं वगळलं गेल्याची शक्यताही आहे, अशी कबुली राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिली. गेल्या ऑगस्टपर्यंत अपात्र मतदारांची नावं वगळण्याची प्रक्रिया राबवली गेली. पण त्यानंतर मात्र मतदारांच्या नोंदणीकडेच सर्व लक्ष केंद्रीत करण्यात आलं तरी सुद्धा काही पात्र मतदारांची नावं चुकून वगळली गेलीत हे आम्ही मान्य करतो. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर मतदार नोंदणीची मोहीम अधिक व्यापक केली जाईल असंही नितीन गद्रे यांनी सांगितलं.Follow @ibnlokmattv// !function(d,s,id){var js,fjsd.getElementsByTagName(s)[0],p/^http:/.test(d.location)?http:https;if(!d.getElementById(id)){jsd.createElement(s);js.idid;js.srcp://platform.twitter.com/widgets.js;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, script, twitter-wjs);// ]]>