21 फेब्रुवारी : आम आदमी पक्षाच्या अंजली दमानियांनी कोळशात 12 हजार कोटीचा केलेला भ्रष्टाचाराचा आरोप बिनबुडाचा असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीचा प्रयत्न असल्याच म्हणत, अजित पवारांनी हे आरोप फेटाळले. तसंच पुरावे दाखवावे चौकशी करायला लावू असा टोलाही लगावला. ते पुण्यात बोलत होते.