मूर्तीवर होणार वज्रलेप

मूर्तीवर होणार वज्रलेप

  • Share this:

21 फेब्रुवारी :  राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ समजल्या जाणार्‍या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातल्या देवीच्या मूर्तीवर आता वज्रलेप करण्यात येणाराय. गेल्या 12 वर्षांपासून वज्रलेपाबाबतचा वाद न्यायालयात होता. मात्र आता हाच वाद निवारण केंद्राकडं वर्ग झालाय. त्यामुळं श्रीपूजकांसह देवस्थान समितीनंही वज्रलेपाबाबत सकारात्मक भूमिका घेतलीय. महालक्ष्मी मंदिर हे 2 हजार वर्षांपूर्वीचं आहे.

1997 सालापासून मूर्तीवरचा अभिषेक बंद करुन केवळ मूर्तीच्या पायांवर अभिषेक केला जातो. पण दररोजची पूजा आणि वातावरणामुळं मूर्तीची मोठी झीज झालीय. त्यामुळंच वज्रलेपाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र काही श्रीपूजकांनी प्राचीन काळच्या मूर्तीमध्ये बदल होऊन तिचं सौंदर्य राहणार नाही आणि सौष्ठवाला बाधा पोहोचेल म्हणून विरोध केला होता. त्याचबरोबर वज्रलेप करताना श्रीपूजकांनी धार्मीक पूजा करुन नये, असं म्हणणं देवस्थान समितीचं होतं.

त्यामुळं श्रीपूजकांनी वज्रलेपाला विरोध केला होता. पण आता श्रीपूजकांनीही वज्रलेप कऱण्याला होकार दिल्यानं आता लवकरचं महालक्ष्मीच्या मूर्तीवर हा वज्रलेप कऱण्यात येणाराय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2014 03:26 PM IST

ताज्या बातम्या