'आप'चे आरोप खोटे

'आप'चे आरोप खोटे

  • Share this:

20 फेब्रुवारी : आम आदमी पार्टीच्या सदस्या अंजली दमानिया यांनी महानिर्मितीवर घोटाळ्याचा आरोप केला. त्यावर महानिर्मितीनंही पत्रक काढून स्पष्टीकरण दिलंय. "गेल्यावर्षी महानिर्मितीनं केंद्र सरकारनं ठरवून दिल्यानुसार एकूण गरजेच्या 8 टक्के कोळसा आयात केला. यावर 1500 कोटींचा खर्च झाला, असं असताना 12 हजार कोटींचा कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप खोटा आहे. भांडवली गुंतवुकीची गरज समजून न घेता त्यातही 10 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही खोटा आणि लोकांची दिशाभूल करणारा आहे." असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2014 10:14 PM IST

ताज्या बातम्या