14 मार्च : जालना मतदारसंघात उमेदवारीवरुन शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर नाराज आहे. आज औरंगाबादमध्ये खोतकर यांची काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडली. परंतु, ही फक्त सदिच्छा भेट होती, सत्तार हे माझे मित्र असून त्यांच्यासोबत चहापानासाठी ही भेट झाली, असा खुलासा खोतकरांनी केला. तसंच येत्या २ दिवसांत माझा निर्णय तुम्हाला कळेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं.