• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमोल पालेकर म्हणतात...'मग औचित्यभंग कसा काय झाला'
  • VIDEO : अमोल पालेकर म्हणतात...'मग औचित्यभंग कसा काय झाला'

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 04:25 PM IST | Updated On: Feb 10, 2019 04:40 PM IST

    पुणे, 10 फेब्रुवारी : सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावं लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एक निर्णयाविरोधात टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना टीका करण्यापासून रोखलं. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखले आणि भाषण लवकर संपवण्यासही सांगितलं. दक्षिणि मुंबईच्या National Gallery of Modern Art या कलादालनात हा प्रकार घडला. याबद्दल पालेकरांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली, आणि आपला निषेध नोंदवला. ''मला हे बोलू नका आणि ते बोलू नका, असं भाषणाआधी कुणीही सांगितलं नाही. मग औचित्यभंग कसा काय झाला,'' असा सवाल त्यांनी आयोजकांना केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी