29 जणांना मृत्यूच्या कवेत घेऊन ८०० फूट खोल दरीत झेपावलेली बस अखेर बाहेर काढण्यात आलीये. सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बसला बाहेर काढण्यात आलंय. 28 जुलै 2018 रोजी दापोली कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पोलादपूर आंबेनळी घाटातील ८०० फूट खोल दरीत कोसळली होती.