आंबेनळी घाट अपघातामध्ये अजूनही काही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा अजूनही निकाल लागलेला नाही. गेल्या काही दिवसांआधी अपघातामध्ये बस चालवत असलेल्या मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे संतप्त 30 मृत कर्मचाऱ्यांचे नातेवाईक दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण यांच्या केबिनमध्ये धडकले.