तुमची मार्कशीट तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही- अक्षय कुमार

तुमची मार्कशीट तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही- अक्षय कुमार

आजचे तरुण तणावातून आत्महत्या करतात यावर अक्षयनं दु:ख व्यक्त केलं. तो म्हणतो, 'कुठलीच समस्या इतकी मोठी नसते, ज्यावर उपाय मिळणार नाही.'

  • Share this:

03 मे : अक्षय कुमारसाठी आजचा दिवस सोनियाचा दिन. त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय. आपला आनंद शेअर करण्यासाठी अक्षयनं एक व्हिडिओ ट्विटरवर टाकलाय.

या व्हिडिओत त्यानं आपल्या जीवनाचे किस्से सांगितलेत. आणि तरुण पिढीला मार्गदर्शन केलंय.

शाळेत असताना अक्की एकदा नापास झाला आणि तेव्हा त्याच्या वडिलांनी तुला कशात रस आहे, असं विचारलं. त्यावर तो म्हणाला, मला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे. तुला आवडेल ते कर आम्ही तुझ्या पाठी उभे आहोत असा विश्वास वडिलांनी दिला. मग मार्शल आर्ट, माॅडेलिंग आणि यशस्वी कलाकार असा अक्षयचा प्रवास झाला.

आजचे तरुण तणावातून आत्महत्या करतात यावर अक्षयनं दु:ख व्यक्त केलं.  तो म्हणतो, 'कुठलीच समस्या इतकी मोठी नसते, ज्यावर उपाय मिळणार नाही.'

अक्षय सांगतो, 'तुमची मार्कशीट तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही.'

त्यानं पालकांनाही उपदेश केलाय. तो म्हणतो, 'तुम्ही मोबाईलमध्ये गढलेले असता, मग तुमच्या मुलांकडे कसं लक्ष देणार? तुमचं मुल फेसबुकवर मित्र शोधत बसतं.'

अक्षयनं आत्महत्या करू नका,असं पुन्हा पुन्हा तळमळून सांगितलंय.

First published: May 3, 2017, 6:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading