• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आम्हाला पण द्या', अजित पवारांनी का मागितली ही कचरापेटी?
  • VIDEO : 'आम्हाला पण द्या', अजित पवारांनी का मागितली ही कचरापेटी?

    News18 Lokmat | Published On: Jan 8, 2019 05:08 PM IST | Updated On: Jan 8, 2019 05:37 PM IST

    जितेंद्र जाधव, बारामती, 08 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या खुमासदार भाषणामुळे चांगलेच चर्चेत असतात. बारामतीमध्ये त्यांच्या हस्ते एका कार शोरूमचे उद्घाटन पार पडले. यावेळी कारमध्ये ठेवता येईल अशा कचरापेटीचे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले असता अजित पवारांनी आपल्या शैलीत या कचरापेटीबद्दल सांगितलं, तेव्हा एकच हशा पिकली. 'ही कचरापेटी कारमध्ये ठेवण्यासाठी बनवली आहे. ती थुंकण्यासाठी नाही. यात छोटा कचरा टाकयाचा. नाहीतर पान, तंबाखू खायची आणि यात पिच पिच करायचं, असं सांगत आपल्यालाही एक द्या', अशी मागणी पवारांनी करून एकच धम्माल उडवून दिली. पवारांनी जेव्हा, "मी इथं टायर घ्यायला आलो होतो, पण माझ्या गाडीचे टायर इथे नव्हते. माझ्या आणि माझी पत्नी सुनेत्राच्या गाडीचे टायर वेगळे आहे. साहेबांच्या गाडीचे टायरही असेच आहे', असं सांगताच एकच हशा पिकली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी