S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • VIDEO :..आणि अजित पवार डोंबिवलीला निघाले लोकलने!

    Published On: Dec 27, 2018 04:26 PM IST | Updated On: Dec 27, 2018 04:35 PM IST

    प्रफुल्ल साळुंखे, 27 डिसेंबर : मुंबईत वाहतुकीला कंटाळून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनी लोकलनं प्रवास करण्याचं पसंत केलं आहे. डोंबिवलीमध्ये एका नियोजित कार्यक्रमासाठी अजित पवार मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयातून निघाले होते. पण वाहतूक कोंडीमुळे जास्त उशीर होणार असल्याचं लक्षात आल्यावर अजित पवार यांनी लोकलने जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सीएसएमटीवरून कसारा जलद लोकलने डोंबिवलीला निघाले आहे. सीएएमटीवरून लोकल पकडल्यामुळे अजित पवारांना खिडकीजवळ जागा मिळाली हे विशेष.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close