'बुलाता है मगर जाने का नही', घराची साफसफाई करतानाचा अदाचा ‘अदाकारीभरा’ VIDEO

'बुलाता है मगर जाने का नही', घराची साफसफाई करतानाचा अदाचा ‘अदाकारीभरा’ VIDEO

लॉकडाऊनमुळे घरात असल्याने सिनेसृष्टीतील कलाकार घरातील विविध अनुभवांचे व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करीत आहेत

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केल्यानंतर अगदी नोकरदार वर्गापासून ते सिनेअभिनेते घरात स्वत: सुरक्षित ठेवत आहेत. कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पसरू नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे. यासाठी घरकाम करणाऱ्यांनाही सुट्टी देण्यात आली आहे. शिवाय वाहतूक बंद असल्याने कोणाही प्रवास करणे शक्य होत नसल्याने घरात राहुन प्रत्येकाला स्वत:चे काम स्वत:चं करावे लागत आहे.

अनेकजण सिनेअभिनेते घरात बसून विविध व्हिडीओ फेसबुकवर (Facebook) शेअर करीत आहेत. आतापर्यंत अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी घरात स्वयंपाक करताना, फरशी पुसताना आणि घरातील स्वच्छता करतानाचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. पार्श्वभूमीवर अभिनेत्री अदा शर्मा हिने एक फरशी पुसतानाही कसा व्यायाम करू शकतो याचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

अदाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती फरशी पुसता – पुसता व्यायामही करीत आहे. यादरम्यान जर तुमचा फोन वाजला तर फोन बुलाता है मगर जाने का नही, असं कॅप्शन तिनं या व्हिडीओला दिलं आहे.

 

 

 

First published: March 25, 2020, 10:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading