'तुझे एकेक शब्द माझ्या काळजात...', मातृशोकात असलेल्या राखीचं मानेंनी केलं सांत्वन

'तुझे एकेक शब्द माझ्या काळजात...', मातृशोकात असलेल्या राखीचं मानेंनी केलं सांत्वन

राखीच्या आईचं निधन झाल्याचं मानेंना कळलं त्यानंतर त्यांनी तिला फोन केला. राखी फोनवर बोलताना ढसाढसा रडली.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी :   बिग बॉस मराठी 4मधील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली जोडी म्हणजे किरण माने आणि राखी सावंत. दोघांची मैत्री आपण घरात पाहिलीच आहे. घरात असताना मानेंनी राखीला खूप सपोर्ट केला. राखीच्या आईचं नुकतं निधन झालं आहे. मातृशोकात असलेल्या राखीचं किरण मानेंनी सांत्वन केलं आहे. माने राखीला प्रत्यक्ष भेटायला जाऊ शकत नसले तरी पोस्ट लिहित राखीचं सांत्वन केलं आहे. तसंच राखी किती स्ट्राँग आहे आणि तिनं तिच्या आईवर किती प्रेम आहे हे देखील त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. राखीच्या आईचं निधन झाल्याचं मानेंना कळलं त्यानंतर त्यांनी तिला फोन केला. राखी फोनवर बोलताना ढसाढसा रडली.  राखी काय बोलली हे किरण मानेंनी पोस्टमध्ये सांगितलं.

किरण मानेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'माने, माझी आई गेली. माझा आधार गेला. मी पोरकी झाले. तुम्हाला माहित आहे माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती. मी काय करू आता?" ओक्साबोक्सी रडणार्‍या राखीचे एकेक शब्द माझ्या काळजात कालवाकालव करत होते. जवळचा मित्र म्हणून फोनवरुन सांत्वन करण्याव्यतिरिक्त मी काहीही करू शकत नव्हतो. खूप हताश झाल्यासारखं वाटलं. आपल्या मैत्रीणीवर दु:खाचा पहाड कोसळलाय आणि आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही ही हतबलता मनाला घेरून टाकत होती'.

हेही वाचा - Sharmishtha Raut : 'अबोली'तून घेतली एक्झिट! आता मालिकेचीच करणार निर्मिती; अभिनेत्रीची मोठी घोषणा

किरण मानेंनी राखीबरोबरची बिग बॉसच्या घरातील मैत्रीचे काही क्षण देखील शब्दांत मांडले आहेत. मानेंनी लिहिलंय, 'बिगबॉसच्या घरात विकास आणि तेजस्विनीनंतर माझी खर्‍या अर्थानं कुणाशी मैत्री झाली असेल तर ती राखी सावंतशी! जे कारण विक्याशी मैत्री होण्याचं होतं तेच राखीशी. विपरीत परीस्थितीचा खडक भेदून उगवून येणारे अंकुर मनापासून भावतात'.

वाचा किरण मानेंनी संपूर्ण पोस्ट

किरण माने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंत त्यांचं सातारकरांनी जंगी स्वागत केलं. घरातून बाहेर आल्यानंतर किरण मानेंना नवे प्रोजेक्ट मिळाले आहेत. त्यातील एका प्रोजेक्टमध्ये किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर एकत्र काम करणार आहेत.

Published by: Minal Gurav
First published: January 30, 2023, 3:51 PM IST

ताज्या बातम्या