पालघर, 20 ऑगस्ट : डहाणूतील सावटा घुंगरपाडा गावातील रहिवासी सुरेश मोहन दुबळा यांच्या घरात 13 फुट लांब आणि 22 किलो वजनाचा भला मोठा अजगर आढळून आलाय. रात्री हा अजगर त्यांच्या घरात कोंबडीची अंडी खात असल्याच निदर्शनास आलं. ताबडतोब त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांना झोपेतून उठवले आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. दुबळा यांच्या घरात कोंबड्यांची अंडी फस्त करणाऱ्या या अजगराला 2.15 वाजता पकडून डहाणू वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. भला मोठा अजगर आढळल्याने घुंगरपाड्यातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.