कोरोनानंतर ट्रॅव्हल लोनची मागणी 10 पटींनी वाढली, मुंबईकर दोन नंबरवर तर पुणे..

कोरोनानंतर ट्रॅव्हल लोनची मागणी 10 पटींनी वाढली, मुंबईकर दोन नंबरवर तर पुणे..

गेल्या एका वर्षात ट्रॅव्हल लोनची मागणी 10 पटीने वाढली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : कोरोना संसर्गामुळे जगभरातील लोक सुमारे वर्षभर घरातच बंदिस्त होते. त्यानंतरही त्यांच्या फिरण्यावर जवळपास एक वर्ष निर्बंध होते. मात्र, आता सर्व निर्बंध उठवण्यात आल्याने लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत पर्यटनाचा आनंद लुटत आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की गेल्या एका वर्षात प्रवास कर्जाची मागणी 10 पट वाढली आहे. यावरुन लोक किती तीव्रतेने बाहेर पडत आहे, याचा अंदाज येतो.

रिपोर्टनुसार, 21-26 वयोगटातील 36% लोकांना प्रवासासाठी प्रवास कर्ज घ्यायचे आहे, तर 27-40 वयोगटातील 52 टक्के लोकांनी कर्जासाठी अर्ज केला आहे. या आधारावर असे म्हणता येईल की तरुणांमध्ये प्रवास करण्याची इच्छा खूप प्रबळ आहे. इंडियालेंड्सने जागतिक पर्यटन दिनानिमित्त जारी केलेल्या अहवालात प्रवासी कर्ज अर्जांवरील तपशीलवार अभ्यास अहवाल शेअर केला आहे.

इंडियालेंड्स हे कर्ज आणि क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी एक ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. याच कालावधीत प्रवास कर्जाचा सरासरी तिकीट आकार कमी झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. पूर्वी ते 95,000 रुपये होते, ते आता 75,000 रुपयांवर आले आहे. याचा अर्थ असा की कर्जासाठी अर्ज करणार्‍या लोकांना त्यांच्या प्रवास खर्चाचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करावे लागेल.

8 शहरांमध्ये अभ्यास करण्यात आला

या अभ्यासात मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई, जयपूर आणि कोलकाता या आठ प्रमुख शहरांमधील नोकरदार आणि स्वयंरोजगार असलेल्या भारतीयांचा समावेश आहे. या भौगोलिक क्षेत्रांमधून प्राप्त झालेल्या एकूण कर्ज अर्जांपैकी, सर्वाधिक कर्ज अर्ज नवी दिल्लीतून आले (22%). त्यापाठोपाठ मुंबई (20%), बेंगळुरू (17%), हैदराबाद (15%), पुणे (13%), चेन्नई (8%) आणि जयपूरमधून 5% अर्ज होते. अहवालात असेही नमूद केले आहे की सर्व अर्जांपैकी 27% महिलांनी देखील कर्ज घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

वाचा - लोकं वजनावरुन उडवायचे खिल्ली, तिनं कामातून दिलं उत्तर! बाईक रायडर साईलीची inspirational स्टोरी

ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड्सची भरभराट

इंडियालेंड्समध्ये ट्रॅव्हल क्रेडिट कार्डमध्ये 6 पट वाढ झाली आहे. 2022 मध्ये, प्लॅटफॉर्मद्वारे जारी केलेल्या ट्रॅव्हल क्रेडिट कार्डांपैकी 75% एअरपोर्ट लाउंजमध्ये मोफत प्रवेशासह आणि 30% पेक्षा जास्त प्रवासी विशेष ऑफरसह आले. इंडियालेंड्सने असेही नोंदवले आहे की ट्रॅव्हल ऑफर ही इलेक्ट्रॉनिक्स नंतर सर्वात जास्त शोधली जाणारी दुसरी श्रेणी आहे.

इंडियालेंड्सचे संस्थापक आणि सीईओ गौरव चोप्रा म्हणाले, “आम्ही अलीकडच्या काही महिन्यांत ट्रॅव्हल लोन आणि क्रेडिट कार्डमध्ये लक्षणीय वाढ पाहिली आहे. महामारीपूर्वीची पातळीही ओलांडली आहे. सणासुदीच्या सुट्ट्या जवळ आल्याने ही वाढ कायम राहावी अशी आमची अपेक्षा आहे. जसजसे जीवन सामान्य होत आहे, तसतसे आपण तरुणांच्या खर्च करण्याच्या पद्धतीत बदल पाहिला आहे. आमचा विश्वास आहे की प्रवास हा आवश्यक आहे. मात्र, प्रवास कर्जाचा सरासरी तिकीट आकार कमी झाला आहे, जो तरुणांचे स्मार्ट आर्थिक नियोजन दर्शवतो.”

Published by: Rahul Punde
First published: September 27, 2022, 2:52 PM IST
Tags: travel

ताज्या बातम्या