Travels tips | महिलांनी प्रवास करण्यापूर्वी 'या' 10 गोष्टी बॅगेत ठेवाव्यात!

Travels tips | महिलांनी प्रवास करण्यापूर्वी 'या' 10 गोष्टी बॅगेत ठेवाव्यात!

तुम्ही प्रवास करत असाल किंवा फिरायला बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर एकदा तुमची बॅग नक्की तपासा. प्रवासाला जाताना आम्ही सांगितलेल्या किमान दहा गोष्टी तुमच्यासोबत असायलाच हव्यात.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : कोणत्याही ठिकाणी फिरायला जायचं असल्यास सर्वात पहिलं काम असते ते म्हणजे व्यवस्थित बॅग पॅक करणे. अनेकदा आपली बॅग अनावश्यक गोष्टींनीच भरुन जाते. लक्षात ठेवा प्रवासाच्या वेळी जीवनावश्यक वस्तू न मिळाल्यास प्रवासाची मजाच कमी होते, त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी एकदा आपली बॅग तपासून पहा. सर्वात महत्वाचं म्हणजे सगळीकडे प्रवासासाठी सारख्याच वस्तू नेण्याची गरज नसते. आपण कुठे जाणार आहोत, त्यावरुन आपल्या प्रवासाच्या सामानाची यादी तयार होते. आम्ही तुम्हाला याच संदर्भात मार्गदर्शन करणार आहोत.

आपत्कालीन किट

आपल्याला आरोग्याला नेहमी प्रथम प्राधान्य द्यायचं असतं. त्यामुळे प्रवास करताना तुम्ही तुमच्या बॅगेत आपत्कालीन किट ठेवा. या किटमध्ये पेन किलर, सॅनिटायझर, हँड वॉश, सुई आणि धागा यासारख्या आवश्यक गोष्टी ठेवण्यास विसरू नका. या सर्व गोष्टी एकाच किटमध्ये ठेवल्यास त्या शोधण्यासाठी पुन्हा पुन्हा बॅग उघडावी लागणार नाही.

कपडे

तुम्ही कुठे जात आहात यावर कोणते कपडे सोबत घ्यावे हे ठरतं. उदाहरणार्थ तुम्ही गोव्याच्या बिचवर जाणार असाल तर तुम्ही टी शर्ट आणि शॉर्टसारखे कपडे घेऊ शकता. मात्र, ट्रेकींग जाताना शक्यतो फुल स्लीव्जचे कपडे असावेत. ऋतूनुसारही यात बदल होऊ शकतो. पावसाळा असेल तर छत्र किंवा रेनकोट आवश्यक आहे. हिवाळा असेल तर गरम कपडे लागतील.

पॉवर बँक

प्रवासात फोनचा सर्वाधिक वापर केला जातो. सेल्फी आणि गुगल मॅप वापरत असताना स्मार्टफोनची बॅटरी संपते. अशा परिस्थितीत फोन चार्ज करण्यासाठी तुम्हाला बॅटरी बॅकअप आवश्यक आहे. ज्याचा तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा वापर करू शकता.

गुलाबी थंडीत कॅम्पिंगचा प्लॅन करताय? मुंबईच्या जवळची ही ठिकाणे सर्वोत्तम

मेकअप बॅग

आता तुम्ही म्हणाल मुलींसाठी ठीक आहे. पण, मुलांनीही घ्यायची का? तर हो. त्वचेची काळजी घेण्यासाठी मुलांनाही मेकअपची गरज आहे. मेकअप बॅग तयार करताना मुली लिपस्टिक, डोळ्यांचा मेकअप यांसारख्या गोष्टी त्यात ठेवतात, पण बॉडी लोशन, हेअर सीरम आणि सॅनिटरी नॅपकिन्स यांसारख्या अत्यावश्यक गोष्टी विसरतात. तसेच, तुम्ही तुमच्या मेकअप बॅगमध्ये शरीराच्या फ्रेशनेस संबंधित गोष्टी ठेवू शकता.

कागदी पिशवी

बॅग पॅक करताना तिकीट, पासपोर्ट, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि व्हिसा इत्यादी ठेवायला विसरू नका. याशिवाय, त्यांना ठेवण्यासाठी योग्य जागा निवडणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून ते कधीही, कुठेही सहज काढता येतील.

टॉर्च

फ्लॅशलाइट हे तुमच्यासाठी प्रवासात उपयुक्त साधन असू शकते. चुकूनही बॅगेत ठेवायला विसरू नका.

हेयर स्ट्रेटनर

जर मुलींना केसांची स्टाइलिंगची आवड असेल, तर त्यासाठी तुम्ही मिनी हेयर इक्विपमेंट तुमच्यासोबत ठेवू शकता. मिनी हेयर इक्विपमेंटला फक्त प्लग इन करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे केस अगदी सहजपणे सरळ किंवा सुकवू शकाल.

औरंगजेब ते अहिल्याबाई होळकर, काशी विश्वनाथ मंदिर उभारणी आणि विध्वंसाची कहाणी

लगेज ट्रॅकर

सामानाची काळजी करण्याची गरज नाही. प्रवासात तुम्हाला तुमच्या सामानाची काळजी वाटत असेल, तर तुम्ही लगेज ट्रॅकर डिव्हाइस वापरू शकता. तुम्हाला फक्त ते चार्ज करायचे आहे आणि ते तुमच्या बॅगेत टाकायचे आहे. तुमचे सामान कुठेतरी हरवले असेल तर तुम्ही या उपकरणाच्या मदतीने ते शोधू शकता.

डायरी आणि पेन

प्रवासासाठी पॅकिंग करताना, बॅगेत डायरी ठेवण्यास विसरू नका. याद्वारे तुम्ही एखाद्या ठिकाणाच्या वैशिष्ट्याबद्दल लिहू शकता आणि आवश्यक असल्यास कोणताही फोन नंबर नोंदवू शकता.

धुण्याच्या कपड्यांची बॅग

तुमचे वापरलेले घाणेरडे कपडे, अंडरगारमेंट्स आणि पादत्राणे वेगळे ठेवण्यासाठी तुम्ही ही बॅग वापरू शकता.

Published by: Rahul Punde
First published: December 18, 2021, 5:59 PM IST

ताज्या बातम्या