सवाई माधवपूरपेक्षा राजस्थानातील 'या' शहराला भेट द्या, पैसा वसूल ट्रिप होईल!

सवाई माधवपूरपेक्षा राजस्थानातील 'या' शहराला भेट द्या, पैसा वसूल ट्रिप होईल!

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा शाही विवाह सोहळा आज राजस्थानमधील सवाई माधवपूर येथे पार पडला. आपला विवाह नाही तर किमान या ठिकाणाला भेट द्यावी असंही काहींच्या मनात आलं असेल. अशीच काही योजना तुमच्याही डोक्यात असेल तर तुमची सहल अविस्मरणीय करण्यासाठी आमच्याकडं आणखी एक प्लॅन आहे.

  • Share this:

मुंबई, 9 डिसेंबर : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) अखेर आज विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानमधील (Rajastan) प्रसिद्ध सवाई माधवपूर (sawai madhopur) येथे उभयंतांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या जोडप्याच्या लग्नाची माहिती मिळाल्यापासून सवाई माधवपूर चर्चेत आलं आहे. आपला विवाह नाही तर किमान या ठिकाणाला भेट द्यावी असंही काहींच्या मनात आलं असेल. अशीच काही योजना तुमच्याही डोक्यात असेल तर तुमची सहल अविस्मरणीय करण्यासाठी आमच्याकडं आणखी एक प्लॅन आहे. राजस्थानला येणारच असाल तर जयपूरला एकदा नक्की भेट द्या. आता तुम्ही म्हणाल जयपूरला काय आहे?

पिंक सिटी किंवा गुलाबी शहर या नावाने हे शहर कदाचित तुम्हाला माहिती असेल. भारताच्या सर्वात मोठ्या राज्याची ही राजधानी आहे. जे स्वादिष्ट घेवर, दाल बाटी चुरमा आणि कांदा कचोरीचं माहेरघर आहे. नाव ऐकताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना? प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागतासाठी या शहराला गुलाबी रंग देण्यात आला होता आणि तेव्हापासून हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाऊ लागले.

काय पहायला मिळणार?

हवा महल (Hawa Mahal)

महाराजा सवाई सिंग यांनी बांधलेला हा राजवाडा अदम्य सौंदर्याचे प्रतीक आहे. हा राजवाडा राजेशाही राण्यांसाठी बांधण्यात आला होता. जेणेकरून त्यांना गल्ली, शेजारी होणारे सण, उत्सव आणि गजबजाट बघता यावी. हे हिंदू, राजपूत आणि इस्लामिक स्थापत्यकलेने बांधला आहे. ज्यामध्ये 953 खिडक्या आहेत जिथून तुम्ही आजूबाजूचे दृश्य पाहू शकाल. खिडक्यांमधून येणारा गार वारा तुम्हाला एक वेगळाच आनंद देतो.

सिटी पॅलेस (City Palace)

इतिहास, आर्किटेक्चर आणि फोटोग्राफी.. जर तुम्हाला या तीनपैकी कोणत्याही गोष्टीची आवड असेल तर तुम्ही खास इथं या. येथून तुम्ही संपूर्ण जयपूर तुमच्या डोळ्यांच्या कवेत घेऊ शकता आणि त्याच्या सौंदर्याचा साक्षीदार होऊ शकता.

नाहरगढ़ किला (Nahargarh Fort)

जयपूर शहरातील प्रसिद्ध किल्ला जो पिकनिक स्पॉट म्हणून लोकांमध्ये लोकप्रिय आहे. येथून तुम्ही जयपूर आणि आमेर शहराचे दृश्य पाहू शकाल. रात्री याचं सौंदर्य आणखीन उजळते. किल्ल्यातील सध्या असलेले रेस्टॉरंटही लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. वॅक्स म्युझियम देखील येथे भेट देण्याच्या ठिकाणाचा एक भाग आहे.

जयगड किला (Jaigarh Fort)

जर तुम्हाला शस्त्रे वगैरे पाहण्याची आवड असेल तर इथे यायला विसरू नका. येथे तुम्हाला राजपूत महाराजांची प्राचीन शस्त्रे आणि तोफगोळे पाहायला मिळतील. 3 किमी अंतरावर पसरलेला हा किल्ला आमेर आणि नाहरगड किल्ल्यांच्या जवळ आहे.

जल महल (Jal Mahal)

मानसागर सरोवराच्या अगदी मध्यभागी असलेला हा किल्ला महाराजा जयसिंग द्वितीय यांनी प्रामुख्याने शिकारीसाठी बांधला होता. मात्र, स्थलांतरित पक्ष्यांची झलक या एका कारणाने लोकांमध्ये तो प्रसिद्ध झाला आहे. येथे अनेक सुंदर पक्षी पाहून तुम्ही तुमची सहल संस्मरणीय बनवू शकाल.

पिंक सिटी बाजा़र (Pink City Bazaar)

हे चार वेगवेगळ्या बाजारांचे मिश्रण आहे जिथे तुम्हाला राजस्थानी चपलांपासून जयपुरी ओढणी आणि सजावटीच्या वस्तू मिळतील. तर या आणि तुमची इच्छा पूर्ण करा.

अल्बर्ट हॉल संग्रहालय (Albert Hall Museum)

प्रिन्स ऑफ वेल्स, अल्बर्ट एडवर्ड यांच्या नावावर असलेले हे संग्रहालय अनेक अद्भुत गोष्टींचे घर आहे. येथे तुम्हाला भारतातील विविध भागांतील चित्रे पाहायला मिळतील. भारताच्या कला आणि संस्कृतीबद्दल जाणून घेण्यासाठी हे सर्वात जुने ठिकाण आहे आणि म्हणूनच त्याचे वेगळे महत्त्व आहे. येथे एक इजिप्शियन ममी देखील आहे जी काही काळापासून लोकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. हे जयपूरमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.

गल्ताजी (Galta Ji)

अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेले हे तीर्थक्षेत्र तुम्हाला शांती आणि अध्यात्मात न्हाहून टाकेल. मंदिराची अनोखी वास्तुशिल्प आणि अतिशय खास ठिकाणी असलेले त्याचे स्थान पर्यटकांना आकर्षित करते. येथील नैसर्गिक वातावरण आणि सात तलाव यामुळे लोक या वातावरणात पूर्णपणे रमतात. हनुमान, राम, कृष्ण, सूर्य आणि विष्णू यांच्या मूर्ती येथे आहेत.

बिरला मंदिर (Birla Mandir)

हे जयपूरमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. हे लक्ष्मीनारायण मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडात साकारलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक याला भेट देण्यासाठी येतात. त्याची भव्य वास्तू आणि मंदिरात ठेवलेली लक्ष्मीनारायणाची मूर्ती अतिशय आकर्षक आहे.

अंबेर किल्ला व महल (Amber Fort And Palace)

राजा मानसिंग पहिला याने बांधलेला हा राजवाडा लाल वाळूचा खडक आणि संगमरवरीमध्ये बनलेला आहे. हे इतक्या सुरेख पद्धतीने बनवले आहे की ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. शत्रूच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहावे म्हणून त्याच्या भिंती उंच केल्या होत्या. येथून तुम्ही माओता तलावाचे अप्रतिम सौंदर्य पाहू शकता. सूर्योदय आणि सूर्यास्ताची दृश्ये तिच्या सौंदर्यात भर घालतात. भिंतींवरील पेंटिंग आणि अलंकारांनी सजलेली कलाकृती त्यात भर घालते.

जंतर मंतर (Jantar Mantar)

महाराजा सवाई जयसिंग यांनी बांधलेल्या या जागेला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून स्थान दिले आहे. हे ज्योतिषशास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय घटनांचा अंदाज घेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. वेळ, दिशा, ग्रहण इत्यादी पुरातन वाद्ये येथे आढळतात. मोठ्या कौशल्याने हे दगड वापरून बनवले जातात.

भूतेश्वर नाथ महादेव (Bhuteshwar Nath Mahadev)

खडकाळ वाट आणि झाडांनी वेढलेले वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला भुतेश्वर नाथ मंदिराचा रस्ता दाखवेल. तुमच्यासाठी हा एक रोमांचक प्रवास असेल कारण तुम्हाला उंचीवर जावे लागेल. 570 मीटर उंचीवर गेल्यावर तुम्हाला विहंगम दृश्य पाहायला मिळेल.

सिसौदिया राणी गार्डन (Sisodiya Rani Bagh)

जयपूरपासून सहा किमी अंतरावर हे उद्यान आहे. बागेतील मनमोहक दृश्ये आणि उत्कृष्ट वास्तुकला पर्यटकांना आकर्षित करत आहे. हे महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी 1728 मध्ये बांधले होते. जर तुम्ही जयपूरच्या सौंदर्याच्या शोधात निघाले असाल तर या ठिकाणी अवश्य भेट द्याल.

सेंट्रल पार्क (Central Park)

हे जयपूरच्या सर्वात मोठ्या आणि रंगीबेरंगी उद्यानांपैकी एक आहे. जयपूरच्या मध्यभागी वसलेले हे उद्यान 5 किमी लांब आहे. निसर्गाचा प्रत्येक रंग पाहण्याची संधी इथे मिळेल. काही नामशेष झालेले पक्षी इकडे तिकडे उडताना दिसतील, त्यांच्या किलबिलाटाने वातावरण भरून जाते.

भेट देण्याची योग्य वेळ कोणती?

जयपूर हे उष्ण प्रदेशांमध्ये मोडते, त्यामुळे जर तुम्ही येथे भेट देण्याचा विचार करत असाल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे महिने योग्य आहेत. कारण, यावेळी हवामान थंड असते. तुम्हाला तुमच्यासोबत भरपूर उबदार कपडे आणावे लागतील. उन्हाळ्यात त्रास सहन करण्यापेक्षा इथं येऊन हिवाळ्यात मजा घेणं कधीही चांगलं नाही का?

कसं पोहचणार?

रोज ट्रीप

मुंबई ते जयपूर हे अंतर 1152 किलोमीटर आहे. कारने, मुंबईहून जयपूरला जाण्यासाठी सुमारे 16 ते 20 तास लागू शकतात. तुम्ही इथं खाजगी बसनेही पोहचू शकता.

रेल्वे

मुंबई ते जयपूर ट्रेनला अंदाजे 16 तास 46 मिनिटे लागतात. तुम्ही मुंबईहून ट्रेन पकडू शकता आणि जयपूरला उतरू शकता. रेल्वे तिकिटाची किंमत अंदाजे 500 ते 600 रुपये आहे.

हवाई मार्ग

फ्लाइट बुक करून तुम्ही मुंबई ते जयपूर प्रवास करू शकता. मुंबई आणि जयपूर दरम्यान एकूण उड्डाण वेळ सुमारे 1 तास 35 मिनिट आहे.

Published by: Rahul Punde
First published: December 9, 2021, 8:31 PM IST

ताज्या बातम्या