Camping | कॅम्पिंगची ही ठिकाणं तुमच्या जीवनाचा अर्थ बदलतील! काय आहे वैशिष्ट्ये?

Camping | कॅम्पिंगची ही ठिकाणं तुमच्या जीवनाचा अर्थ बदलतील! काय आहे वैशिष्ट्ये?

भारतातील काही ठिकाणे कॅम्पिंगसाठी खूप प्रसिद्ध आहेत, जर तुम्हाला कॅम्पिंगची आवड असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : शहराच्या गोंगाटापासून दूर कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात रात्र घालवण्याचा अनुभव काही औरच. यातही मित्र, मैत्रिणी सोबत असल्या तर विचारायलाच नको. सोलो कॅम्पिंगचा तर अनुभवच वेगळा. भारतातील काही ठिकाणे कॅम्पिंगसाठी खूप प्रसिद्ध आहेत, जर तुम्हाला कॅम्पिंगची आवड असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या. प्रवासामुळे तुम्हाला जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो. तुम्हाला नवीन ठिकाणची संस्कृती, खाद्यपदार्थ, बोलचाल आणि परिसराची ओळख होते. प्रवासाचा अर्थ फक्त गर्दीच्या हिल स्टेशनला भेट देणे आणि हॉटेल्समध्ये राहणे असा नाही तर नवीन ठिकाणाचा आनंद घेणे देखील आहे. तुम्हालाही असेच अनुभवायचे असेल, तर तुम्ही नक्कीच कॅम्पिंगचा आनंद घ्यावा.

कॅम्पिंगची संस्कृती भारतात झपाट्याने विकसित झाली आहे. अनेक भागांमध्ये कॅम्पिंग हा एक मोठा व्यवसाय बनला आहे. चला तर मग जाणून घेऊया अशाच 5 कॅम्पिंग ठिकाणांबद्दल जे तुमची सहल सार्थकी लावतील.

जैसलमेर

जर तुम्हाला डोंगराळ प्रदेश नको वाटत असेल तर वाळूमध्ये रात्र घालवणे ही एक चांगली कल्पना असू शकते. राजस्थानमधील जैसलमेर कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. पिवळ्या वाळूमध्ये पांढर्‍या तंबूत राजस्थानी खाद्यपदार्थ आणि लोकसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला येथे विदेशी पर्यटकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळेल. खिशाच्या दृष्टीनेही इथे कॅम्पिंग खूप स्वस्त आहे आणि हिवाळ्यात तुम्ही इथे कॅम्पिंगचा अधिक आनंद घेऊ शकता.

अंजुना बीच, गोवा

जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बीचवर रात्र घालवण्याचे स्वप्न पाहिले असेल तर गोवा तुमची वाट पाहत आहे. तुम्ही अंजुना आणि उत्तर गोव्याच्या इतर समुद्रकिनाऱ्यांवर कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. इथे कॅम्प केल्याने तुम्हाला इतर ठिकाणांपेक्षा वेगळे वाटेल.

Varanasi | बनारसला जायचे असेल तर 'या' दिवसातच भेट द्या, जाणून घ्या कारण

स्पिती व्हॅली, हिमाचल

लाहौल आणि स्पिती हे हिमाचलचे दुर्गम भाग आहेत, जिथे फक्त डोंगरी जमाती राहतात. ही ठिकाणे कॅम्पिंगसाठी खूप प्रसिद्ध आहेत. पर्यटकांच्या वाढीमुळे, अनेक कंपन्या स्पिती व्हॅलीमध्ये कॅम्पिंग आयोजित करतात. हिवाळ्याऐवजी उन्हाळा येथे कॅम्पिंगसाठी चांगला काळ आहे. कारण या काळात हिमालयाचे चांगले दृश्य देखील पाहता येते.

मसुरी, उत्तराखंड

जर तुम्हाला हिमाचल किंवा दुर्गम डोंगराळ भागात जाणे शक्य नसेल, तर तुम्ही मसुरीजवळ कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. हे दिल्लीपासून अगदी जवळ आहे. येथे तुम्ही मार्च ते जूनपर्यंत कॅम्पिंगसाठी जाऊ शकता.

सोनमर्ग, काश्मीर

जर तुम्हाला पर्वत, नदी आणि कॅम्पिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर काश्मीरमधील सोनमर्ग तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. सुंदर पर्वतीय दृश्यांमध्ये नदीजवळ काही दिवस घालवून तुम्ही जीवनात शांतता अनुभवू शकता. येथे पोहोचणे देखील अवघड नाही, रस्त्याच्या मदतीने श्रीनगरहून थेट सोनमर्गला जाता येते.

Published by: Rahul Punde
First published: January 14, 2022, 4:24 PM IST

ताज्या बातम्या