फक्त सीट बेल्ट किंवा ओव्हर स्पीडिंग नाही तर या कारणांमुळंही तुमचं चलन कापलं जाईल; हे नियम माहिती आहे का?

फक्त सीट बेल्ट किंवा ओव्हर स्पीडिंग नाही तर या कारणांमुळंही तुमचं चलन कापलं जाईल; हे नियम माहिती आहे का?

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला अनेक वेळा महागात पडू शकते. सामान्यतः लोक फक्त ओव्हर स्पीडिंग, सिग्नल तोडणे, सीट बेल्ट न लावणे, ही चलनाची कारणे मानतात. मात्र, यासोबतच इतरही अनेक कारणे आहेत ज्यांबद्दल लोकांना माहिती नसते.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : वाहतुकीचे नियम आणि चलन, हे दोन शब्द प्रत्येक वाहनचालकाच्या परिचयाचे झाले असतील. अशा परिस्थितीत, सामान्यत: जेव्हा चलन येतं तेव्हा सिग्नल तोडणे, ओव्हर स्पीडिंग, कागदपत्रांशिवाय गाडी चालवणे, सीट बेल्ट न लावणे इत्यादी नियम तुम्हाला माहित झाले असतील. पण तुम्हाला माहीत आहे का की जर तुम्ही गाडी रस्त्यावर पार्क केली. आणि ती सुरू असेल तेव्हाही तुमचे चलन कापले जाऊ शकते. इतकंच नाही तर तुमच्या वाहनात ऍक्सेसरीच्या नावाने स्क्रीन लावली असेल आणि त्यावर व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेत असाल तर ते तुमच्या खिशाला भारी पडू शकते. चला असे काही नियम जाणून घेऊया ज्यामुळे तुमचे चलन कापले जाऊ शकते आणि तुमचा खिसा मोकळा होऊ शकतो.

पार्क गाडी चालू केली तर….

हा नियम संपूर्ण देशात लागू असला तरी त्याचा परिणाम मुंबईत अधिक दिसून येत आहे. मुंबईत तुम्ही पार्किंगमध्ये गाडी स्टार्ट ठेवल्यास तुमचे चलन कापले जाऊ शकते. हा नियम लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रदूषण. अशा परिस्थितीत तुमचे 2 हजार रुपयांपर्यंतचे चलन कापले जाऊ शकते.

शहरात हायबीम (लाईट्स) वापरल्यास 1 हजार दंड

शहरात रात्रीच्या वेळी वाहन चालवताना हाय बीमचा वापर केल्यास ते नियमांचे उल्लंघन असून त्यावर 1000 रुपयांपर्यंतचे चलन कापले जाऊ शकते. हायबीम हे डिपर पुरवण्यासाठी आणि महामार्गावर वापरण्यासाठी असतात.

वाचा - टँकरची जोरदार धडक, 20 फुटांपर्यंत फरफटत गेली कार; भीषण अपघाताचे PHOTO आले समोर

कारमध्ये मल्टीमीडिया स्क्रीन असेल तर..

आजकाल मल्टी-मीडिया स्क्रीन सहसा वाहनांमध्ये अपर व्हेरिएंट्समध्ये दिसतात. पण त्यातील व्हिडिओ ऑप्शन तुमची कार पार्क केल्यावरच काम करते. मात्र, काही लोक वाहनांमध्ये ऍक्सेसरी म्हणून स्क्रीन्स बसवतात, या स्क्रीनवर सर्व वेळ व्हिडिओ प्ले होऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कारमधून प्रवास करत असताना चालत्या वाहनात स्क्रीनवर व्हिडिओचा आनंद घेत असाल तर तुम्हाला 5 हजार रुपयांचे चलन मिळू शकते.

रॅपिंग किंवा रीपेंट

आजकाल कार रॅपिंग हा एक ट्रेंड आहे. उदाहरणार्थ, पांढऱ्या रंगाची कार घेतल्यावर, जर एखाद्याने ती मॅट काळ्या रंगात रॅपिंग केली तर ते मोठ्या चलनाला आमंत्रित करणे आहे. वाहन पुन्हा रंगवण्याच्या बाबतीतही असेच आहे. कारण नोंदणीमध्ये तुमच्या वाहनाचा रंग नोंदवला जातो. जर तुम्ही रॅपिंग किंवा पुन्हा पेंट केले तर त्या स्थितीत तुम्हाला त्याबद्दल आरटीओमध्ये माहिती देणे तसेच आरसीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

एक्झॉस्ट सिस्टम

आजकाल, महागड्या एक्झॉस्ट सिस्टीम वाहनात खूप लोकप्रिय होत आहेत, लाखोंच्या किमतीत येणाऱ्या या लाऊड ​​एक्झॉस्ट सिस्टीममुळे तुमचे चलन तर होतेच पण तुमचे वाहनही जप्त केले जाऊ शकते. कारण त्यावर पूर्णपणे बंदी आहे. याचे कारण म्हणजे या एक्झॉस्ट सिस्टीममधून निघणारा मोठा आवाज. त्यांच्यावर सुमारे 10 हजारांचे चलन असून वाहन जप्त करण्याचीही तरतूद आहे.

लाईट्स आणि हॉर्न

आजकाल अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प देतात. मात्र, कंपन्यांनी दिलेले दिवे मानकांनुसार असतात. मात्र, अॅक्सेसरीज मार्केटमध्ये बरेच प्रोजेक्टर हेडलॅम्प आहेत, ज्यात हाय वॅटेज हेडलॅम्प असतात ते RTO मानकांनुसार येत नाहीत. अशा दिव्यांचा वापर केल्यास मोठा भुर्दंड बसेल. त्याचबरोबर प्रेशर हॉर्नवरही बंदी असून त्यांच्यावरही दोन हजारांचे चलन आहे.

Published by: Rahul Punde
First published: September 9, 2022, 2:45 PM IST

ताज्या बातम्या