स्वित्झर्लंडला जाण्याचा आनंद भारतातच घ्यायचा असेल तर 'या' ठिकाणी डोळे झाकून जा!

स्वित्झर्लंडला जाण्याचा आनंद भारतातच घ्यायचा असेल तर 'या' ठिकाणी डोळे झाकून जा!

तुम्हाला स्वित्झर्लंडला (Switzerland) जाण्याचा आनंद भारतातच घ्यायचा असेल तर मणिपूर (Manipur) राज्यात डोळे झाकून जा. कोलकात्याहून तुमची फ्लाइट ईशान्य भारताच्या दिशेने येईल, तेव्हा तुम्हाला मणिपूरचे असे नजारे दिसतील की तुम्हाला फ्लाइटमधून लगेच उतरावं वाटेल.

  • Share this:

मुंबई, 28 जानेवारी : प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असते. यातही स्वित्झर्लंड (Switzerland) हे तर अनेकांचे डेस्टीनेशन असते. मात्र, अनेक कारणांमुळे तिथं जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही. पण, निराश होऊ नका. कारण, आपल्या देशातच तुम्हाला स्वित्झर्लंड अनुभवता येईल. मणिपूर (Manipur) हे एक असे ठिकाण आहे जे केवळ सौंदर्य आणि नैसर्गिक दृश्यांसाठी देशात नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मणिपूरला भारताचे स्वित्झर्लंड (Switzerland of india) देखील म्हणतात. कोलकात्याहून तुमची फ्लाइट जेव्हा ईशान्य भारताच्या दिशेने येईल, तेव्हा तुम्हाला मणिपूरचे असे नजारे दिसतील की तुम्हाला फ्लाइटमधून लगेच उतरावं वाटेल. मणिपूरचे हिरवेगार मखमली पर्वत आणि नैसर्गिक नजारे प्रत्येकाच्या मनात घर करतात.

मणिपूरचा 76 टक्के भूभाग जंगलाने वेढलेला आहे, यावरून तुम्ही इथल्या हिरवाईचा अंदाज लावू शकता. तुम्हाला इको टुरिझममध्ये रस असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. विशेष म्हणजे मणिपूरची (Manipur) राजधानी इम्फाळ हे येथील सर्वात सुंदर ठिकाण आहे. आज आम्ही तुम्हाला मणिपूरमधील अशा 5 ठिकाणांबद्दल सांगत आहोत, ज्यावरून तुम्हाला समजेल की मणिपूरला भारताचे स्वित्झर्लंड का म्हणतात.

लोकटक तलाव Loktak lake

हा मणिपूरमधील सर्वात मोठा आणि फ्रेश तलाव आहे, जो इंफाळपासून 45 किमी अंतरावर आहे. हे जगातील पहिले सरोवर आहे जिथे तरंगणारी बेटे एकत्र येतात. असे म्हटले जाते की लोकटक तलावामध्ये 100 हून अधिक पक्षी, 233 जलचर वनस्पती आणि 425 वन्य प्राण्यांच्या प्रजाती आहेत. हा तलाव दिसायला खूप सुंदर दिसतो. या सरोवराच्या पाण्यात तरंगणारी छोटी गवताळ बेटं एखाद्या जादुई जगासारखी दिसतात.

ईमा मार्केट Ima Market

मणिपूरमध्ये आईला इमा म्हणतात. हा असा बाजार आहे जो तिथल्या माताद्वारे चालवला जातो. इमा मार्केटचे दोन भाग आहेत, एक भाग भाजीपाला, स्वस्त मसाले आणि मासे पुरवतो, तर दुसरा भाग घरगुती गरजेच्या वस्तू पुरवतो. येथून थोड्याच अंतरावर दुसरे मार्केट सुरू होते, जिथे हाताने बनवलेले कपडे मिळतात. या बाजारातील दुकानांच्या मालक सर्व स्थानिक महिला असल्याने येथे जाण्याची मजा काही औरच असते.

मणिपूर राज्य संग्रहालय

तुम्हाला कधी मणिपूरच्या संस्कृतीबद्दल किंवा मणिपूरच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक वारशाबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर मणिपूर राज्य संग्रहालयाला नक्की भेट द्या. या म्युझियममध्ये तुम्हाला मणिपूरच्या राजघराण्यासोबत येथील आदिवासी जीवन पाहण्याची संधी मिळेल. या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे सध्या असलेली 78 फूट लांब शाही बोट आहे. हे छोटेसे दिसणारे म्युझियम खूप खास आहे. या संग्रहालयाची उघडण्याची वेळ सकाळी 10 तर बंद होण्याची वेळ 4 वाजता आहे.

कांगला पॅलेस Kangla palace

हा किल्ला मणिपूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्याचा मुख्य दरवाजा अतिशय राजेशाही शैलीत बांधलेला आहे, ज्यावर चिनी वास्तुकलेचा प्रभाव आहे. या किल्ल्यात कांगला संग्रहालय नावाचे एक संग्रहालय देखील आहे. मणिपूरच्या 7 राजांनी या महालावर राज्य केल्याचे सांगितले जाते. मात्र, आज या वाड्याचा काही भाग भग्नावस्थेत बदलला आहे. पण इथे गेल्यास इथला इतिहास स्पष्ट दिसेल.

Published by: Rahul Punde
First published: January 28, 2022, 4:21 PM IST

ताज्या बातम्या