ISRO ची भारतीयांसाठी गुड न्यूज! आता तुम्हीही अंतराळात प्रवास करू शकाल, अशी आहे योजना

ISRO ची भारतीयांसाठी गुड न्यूज! आता तुम्हीही अंतराळात प्रवास करू शकाल, अशी आहे योजना

अंतराळ पर्यटन सध्या खूप महाग आहे. या वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकन कंपनी Axiom Space ने 3 व्यावसायिकांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISI) ची सफर घडवून आणली होती. रिपोर्टनुसार एका प्रवाशाकडून सुमारे 420 कोटी रुपये वसूल करण्यात आले. भारत अंतराळ पर्यटनाच्या दिशेने स्वदेशी क्षमता विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जुलै : 16 सप्टेंबर 2021ला इलॉन मस्क यांच्या 'स्पेस एक्स' कंपनीनं आपल्या 'क्रू ड्रॅगन' यानातून पर्यटकांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पर्यटन घडवलं. हे पर्यटन तीन दिवसांचं होतं. त्यानंतर आता जगातल्या बड्या उद्योजकांची तसंच त्यांच्या अंतराळ कंपन्यांची स्पर्धा निर्माण झाली आहे. यात आता भारतानेही उडी घेतली आहे. भारतात लवकरच अंतराळ पर्यटन शक्य होईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी सांगितले. त्यांनी माहिती दिली की भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (Low Earth Orbit) मानवी अंतराळ उड्डाण क्षमतेचे प्रात्यक्षिक करून अंतराळ पर्यटनासाठी स्वदेशी क्षमता विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. अंतराळ पर्यटन सध्या खूप महाग आहे. या वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकन कंपनी Axiom Space ने 3 व्यावसायिकांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISI) ची सफर घडवून आणली होती. रिपोर्टनुसार एका प्रवाशाकडून सुमारे 420 कोटी रुपये वसूल करण्यात आले.

सध्या Axiom Space आणि SpaceX सारख्या कंपन्या अमेरिकन अंतराळ संस्था NASA च्या सहकार्याने या क्षेत्रात बाजारपेठ निर्माण करण्यात गुंतलेल्या आहेत. राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, राष्ट्रीय अंतराळ प्रोत्साहन आणि प्राधिकरण केंद्र (IN-SPACE) ने अवकाश पर्यटनाच्या समावेशासह या उपक्रमांमध्ये खाजगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अंतराळ मुत्सद्देगिरीवरील प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, इस्रोने अंतराळ घडामोडींच्या विविध क्षेत्रात 61 देशांशी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संबंध पुढे नेले आहेत.

बोटिंग,भटकंती अन् खूप काही; मारंबळपाडा ठरलं मुंबई परिसरातील पहिलं इको-टुरिझम गाव

दुसर्‍या एका प्रश्नाच्या उत्तरात जितेंद्र सिंह म्हणाले की, अंतराळ विभाग एक सर्वसमावेशक व्यापक इंटीग्रेटेड स्‍पेस धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे, जे खाजगी अवकाश उद्योगाच्या प्रयत्नांना मार्गदर्शन करेल. विशेष म्हणजे, नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेली एकल विंडो एजन्सी आहे जी अंतराळ संशोधन क्षेत्रात खाजगी क्षेत्राला सामील करून अधिकृत करते. इस्रो मिशन गगनयान (Mission Gaganyaan) अंतर्गत आपल्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ उड्डाणावर देखील काम करत आहे. नुकतेच सरकारकडून सांगण्यात आले की भारतीय अंतराळ संशोधन संस्था पुढील वर्षापर्यंत अंतराळात मानव पाठवण्यात यश मिळवेल.

पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले होते की, पुढील वर्षी ISRP च्या गगनयान मिशन अंतर्गत भारताचे 2 अंतराळवीर अवकाशात जाणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. पहिल्या चाचणीत मानवरहित वाहन अवकाशात पाठवले जाईल. तर दुसऱ्यांदा हे वाहन रोबोटसह अंतराळात जाणार आहे. या रोबोला व्योमित्र असे नाव देण्यात आले आहे. चाचणीच्या निकालांचे विश्लेषण केल्यानंतर इस्रो मानवी अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याबाबत अंतिम निर्णय घेईल.

Published by: Rahul Punde
First published: July 24, 2022, 2:29 PM IST
Tags: isro

ताज्या बातम्या