देशातील अनोखं गाव, जिथं कोट्याधीश राहतात कच्च्या घरात! काय आहे कारण?

देशातील अनोखं गाव, जिथं कोट्याधीश राहतात कच्च्या घरात! काय आहे कारण?

Devmali Unique village in Ajmer: राजस्थानमधील (Rajasthan News) अजमेरचे देवमाळी हे असे अनोखे गाव आहे जिथे कोट्याधीश कच्च्या घरात राहतात. या गावातील लोकं दारू आणि मांसाहाराल स्पर्शही करत नाहीत. सर्व गावकरी पहाटे गावाच्या संपूर्ण डोंगरावर अनवाणी प्रदक्षिण घालतात. या टेकडीवर देवनारायणाचे मंदिर आहे. अनेक दशके उलटली, पण देवमाळी गावात एकही पक्क घर बांधलं नाही.

  • Share this:

अजमेर, 29 डिसेंबर : कोट्याधीश (millionaires) लोकं कच्च्या घरात राहतात असं सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का? घरात सर्व आधुनिक सोयी-सुविधा (Morden Amenities) आणि चिक्कार पैसा असतानाही ही लोकं पक्की घरं का बांधून राहत नाही, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. राजस्थानच्या (Rajasthan) अजमेर(Ajmer)  जिल्ह्यातील देवमाळी (Devmali Village) हे गाव अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गावात अनेक कोट्याधीश आहेत, पण घरांना कुलूप नाही. गेल्या पाच दशकात एकाही घरात चोरी झाली नाही की पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल झालेली नाही. गावातील संपूर्ण जमीनही भगवान देवनारायण (DevNarayan God) यांच्या नावावर आहे. संपूर्ण गाव शाकाहारी आहे. देवमाळी गावात पक्क्या छताचे एकही घर बांधले गेलेले नाही. पक्के छत बांधल्यास गावात आपत्ती येऊ शकते, असे ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे या गावातील कोट्याधीशही कच्च्या घरात राहतात.

सर्व गावकरी पहाटे गावाच्या संपूर्ण डोंगरावर अनवाणी प्रदक्षिणा घालतात. या टेकडीवर देवनारायणाचे मंदिर आहे. ग्रामस्थांची भगवान देवनारायण यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. असे मानले जाते की देवनारायण जेव्हा या गावात आले तेव्हा त्यांना गावकऱ्यांच्या सेवाभावनेने खूप आनंद झाला. त्यांनी गावकऱ्यांना वरदान मागायला सांगितल्यावर गावकऱ्यांनी काही मागितले नाही. त्यावर देवनारायण जाऊन म्हणाले की, शांततेत राहायचे असेल तर पक्के छत असलेले घर बांधू नका. गावकरी आजही त्याचे पालन करतात. अनेक दशके उलटली, पण देवमाळी गावात एकही पक्क घर बांधलं गेलं नाही.

खेडेगावात सर्व सोयीसुविधा उपलब्ध पण घरे मात्र कच्ची

सुमारे 25 वर्षे गावच्या सरपंच राहिलेल्या भागीदेवी गुर्जर यांनी सांगितले की, संपूर्ण गावात असलेली पौराणिक मान्यता आणि देवनारायण देवावरील श्रद्धेमुळे आम्ही माती आणि दगडापासून कच्ची घरे बांधून राहतो. या गावातील श्रीमंत लोकही मातीच्या कच्च्या घरात राहतात. पक्के छत बांधल्यास गावात आपत्ती येऊ शकते, असा त्यांचा विश्वास आहे. घरात सर्व सुविधा उपलब्ध आहेत, फक्त घरे कच्ची आहेत. घरात टीव्ही, फ्रीज, कुलर, महागडी आलिशान वाहने उपलब्ध असूनही कच्ची घरे कायम आहेत.

Hampi vitthal mandir | हंपी येथील विठ्ठल मंदिराविषयी या 2 आख्यायिका माहिती आहे?

ग्रामस्थांनी पक्के छत टाकण्याचा प्रयत्न केला, पण..

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेकांनी पक्के छत टाकण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना त्याचा फटका सहन करावा लागला. तेव्हापासून अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने ग्रामस्थ पक्के छत बांधत नाहीत. कच्ची, गवताचा माळ आणि केळूपासून बनवलेली घरेच देवमाळीच्या सौंदर्यात भर घालतात. गावकरीही सिमेंट-चुना वापरत नाहीत. गावकरी दारू, मांस आणि अंड्यांना स्पर्शही करत नाही.

गावात वीज गेल्यावर रॉकेल नाही तर तिळाच्या तेलाचे दिवे लावतात

गावात 300 कुटुंबांची वस्ती आहे. लोकसंख्या 2000 च्या आसपास आहे. तसेच संपूर्ण गावात एकाच गोत्राचे लोक राहतात, जे भगवान देवनारायणाची पूजा करतात. जिथे त्यांना पुजारी मानले जाते. देवमाळी गावात गुर्जर समाजाचे (Gurjar Samaj) लोक राहतात. गुर्जर समाजाचे आराध्य दैवत भगवान देवनारायण यांचे मंदिर (Lord Devnarayan Temple) गावातील टेकडीवर बांधलेले आहे. गावात जेव्हा वीज जाते तेव्हा लोकं रॉकेल वापरत नाही तर तिळाच्या तेलाचे दिवे लावतात. जातात तेव्हा रॉकेल (केरोसीन) वापरले जात नाही.

गुजरातमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला 'या' 5 गोष्टी माहित असणे आवश्यक!

भाद्रपद महिन्यात भरते जत्रा

मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की, देवावरील श्रद्धेमुळे सर्व घरे कच्च्या मालापासून बांधली आहेत. भाद्रपद महिन्यात येथे जत्रा भरते आणि राजस्थानातील अनेक जिल्ह्यांतून पर्यटक पायीच येतात. आम्ही गावात पाण्याच्या टाक्या बांधल्या नाहीत, तर प्लास्टिकच्या डब्यांमध्ये पाणी साठवतो. पक्के छत नसतानाही हे गाव गजबजले आहे. गावातील शाळा व धर्मशाळा मात्र पक्क्या बांधल्या आहेत. ग्रामस्थांकडे एक इंचही जमीन नाही. गावातील सर्व जमीन भगवान देवनारायण यांच्याकडे आहे. ही जमीन गावकऱ्यांच्या नावावर होत नाही. पशुपालनातूनच इथले जीवन जगत आहे. याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा. मात्र, गावकऱ्यांच्या या श्रद्धेने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. या गावात देश-विदेशातून भाविक येत असतात.

गुजर लोक देवनारायणासह निसर्गाची पूजा करतात

आजपर्यंत या गावात कधीही चोरी झाली नसल्याचे गावातील ज्येष्ठ सांगतात. एकदा चोरट्यांनी टेकडीवर बांधलेल्या मंदिरात प्रवेश केला. दानपेटीत ठेवलेले पैसे चोरले, पण पुढे जाता आले नाही. नंतर चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले. येथील बगडावत भोपा गुर्जर देवनारायणाच्या पूजेत अनेक दिवस आणि अनेक रात्री भजने गातात. अशिक्षित असूनही भोपांची स्मरणशक्ती चांगली आहे. त्यांच्या तोंडून बगडावतची कथा ऐकण्यासाठी हजारो लोक जमतात. देवनारायणांकडे लोक काही मागत नाहीत. फक्त शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात.

Published by: Rahul Punde
First published: December 29, 2021, 7:52 PM IST

ताज्या बातम्या