गाडीची चावी किंवा हवा काढण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? प्रत्येकाला हे नियम माहितीच हवेत

गाडीची चावी किंवा हवा काढण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? प्रत्येकाला हे नियम माहितीच हवेत

वाहतूक पोलिसांच्या कारवाईदरम्यान अनेकवेळा काही पोलिसांची गैरवर्तणूकही पाहायला मिळते. कधी परवानगी न घेता दुचाकीची चावी काढतात तर कधी विनाकारण टायरची हवा काढतात.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : रस्त्यावर कार (Car) किंवा बाइक (Bike) किंवा कोणतंही चालवताना वाहतुकीच्या नियमांचं (Traffic Rules) पालन करणं बंधनकारक असतं. परंतु, बऱ्याचदा अनेकजण घाईने, अनवधानाने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यात हयगय करतात. बाइक चालवताना हेल्मेट न घालणं, कारमध्ये सीट बेल्ट न लावणं किंवा सिग्नलचं उल्लंघन करणं असे प्रकार अनेकांकडून होतात. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांना (Traffic Police) वाहनमालक किंवा चालकावर (Driver) कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार असतो. अशा कारवाईदरम्यान काही पोलिसांकडून गैरवर्तनही घडल्याची उदाहरणं पाहायला मिळतात. ते कोणतीही परवानगी न घेता बाइकची चावी काढतात तर कधी विनाकारण टायरमधली हवा (Air) सोडतात. हे वर्तन योग्य की अयोग्य, पोलिसांना कायदा (Law) असं वागण्याची परवानगी देतो का, असे प्रश्न तुम्हाला कधी पडले आहेत का?

नियम काय सांगतो?

तपासणीदरम्यान पोलिसांना तुमच्या गाडीची चावी काढून घेण्याचा किंवा गाडीच्या टायरमधली हवा सोडण्याचा अधिकार नाही. एखादा पोलीस कर्मचारी तुमच्या गाडीची चावी काढून घेत असेल तर ती बाब नियमबाह्य आहे. नियमानुसार, कॉन्स्टेबलला (Constable) अटक करण्याचा किंवा कोणतंही वाहन जप्त करण्याचा अधिकार नसतो. भारतीय मोटार वाहन कायदा 1932 नुसार, सहायक पोलीस उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector) किंवा त्यावरच्या दर्जाचा अधिकारी दंड वसूल करू शकतो. कॉन्स्टेबल हे फक्त या अधिकाऱ्याच्या मदतीसाठी असतात.

वाचा - चंडीगडमध्ये MMS लिक प्रकरण! अशा परिस्थितीत महिलांचे कायदे आणि अधिकार माहितीय का?

कॉन्स्टेबल गाडीची चावी काढू शकत नाहीत

याशिवाय वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही किंवा गाडीच्या टायरमधली हवा सोडू शकत नाही. या गोष्टी करण्याचा त्यांना अधिकार नाही. याशिवाय तपासणीदरम्यान पोलीस तुमच्यासोबत गैरवर्तन करू शकत नाहीत. एखादा पोलीस कर्मचारी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल किंवा तुमच्यासोबत गैरव्यवहार करत असेल तर तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे त्याची तक्रार करू शकता.

`या` गोष्टी लक्षात ठेवा

तपासणीदरम्यान पोलीस कर्मचारी गणवेशात (Uniform) असणं गरजेचं आहे. पोलीस कर्मचारी गणवेशात नसेल, तर तुम्ही त्याच्याकडे त्याचं ओळखपत्र मागू शकता. त्याने ओळखपत्र दाखवण्यास नकार दिला तर तुम्हीदेखील कागदपत्रं सादर करण्यास नकार देऊ शकता. दंड वसूल करतेवेळी पोलिसांकडे दंड पावती पुस्तक किंवा ई-चलन मशीन (E-Challan Machine) असणं आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी नसतील, तर पोलीस तुमच्याकडून दंड वसूल करू शकत नाहीत. पोलिसांनी तुमची कागदपत्रं जप्त केली, तर त्याची पावती त्यांच्याकडून घेणं गरजेचं आहे.

First published: September 19, 2022, 4:09 PM IST

ताज्या बातम्या