Indian Railways: महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ दोन ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, प्रवासापूर्वी वाचा डिटेल्स

Indian Railways: महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ दोन ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, प्रवासापूर्वी वाचा डिटेल्स

नागपूर विभागातील ट्रॅफिक ब्लॉकमुळं नागपूर-कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेसची एक फेरी रद्द करण्यात आली आहे, तर अमरावती-तिरूपती-अमरावती एक्स्प्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट: तुम्ही जर पुढच्या दोन दिवसांत ट्रेननं (Indian Railways) प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. विविध कारणांमुळे रेल्वेनं प्रवास करू इच्छिणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या ट्रेनच्या वेळापत्रकात तात्पूरता बदल झाला आहे. नागपूर विभागातील ट्रॅफिक ब्लॉकमुळं नागपूर-कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेसची (Kolhapur-Nagpur Express) एक फेरी रद्द करण्यात आली आहे, तर अमरावती-तिरूपती-अमरावती (Amaravati- Tirupati Express) एक्स्प्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 15 ऑगस्टला कोल्हापूरहून सुटणारी कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच 15 ऑगस्टला अमरावतीहून सुटणारी अमरावती-तिरूपती एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

रेल्वे वाहतूक ही परवडणारी आणि आरामदायी प्रवासासाठी उत्तम मानली जाते. त्यामुळं प्रवासी नेहमीच रेल्वेनं प्रवास करायला प्राथमिकता देत असतात. अशातच आता 15 ऑगस्ट रोजी रेल्वेनं प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना आपल्या नियोजनात बदल करावा लागणारा आहे. कारण महाराष्ट्रातून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या ट्रेनचं वेळापत्रक बदल आहे. यापैकी एका ट्रेनची फेरी रद्द करण्यात आली आहे, तर एका ट्रेनच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. नागपूर विभागातील ट्रॅफिक ब्लॉकमुळं नागपूर-कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेसची एक फेरी रद्द करण्यात आली आहे, तर अमरावती-तिरूपती-अमरावती एक्स्प्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 15 ऑगस्टला कोल्हापूरहून सुटणारी कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भाला जोडणारी ही महत्त्वाची एक्स्प्रेस आहे. सुमारे 1050 किमी अंतर ही ट्रेन साधारणपणे 23 तासांत पूर्ण करते. दररोज हजारो प्रवासी या ट्रेननं प्रवास करत असतात. परंतु या ट्रेनची फेरी रद्द झाल्यामुळं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा-  गर्दीत बाहेर न जाता घरीच एन्जॉय करता येईल Long Weekend, 10 टिप्स करा फॉलो

तसेच 15 ऑगस्टला अमरावतीहून सुटणाऱ्या अमरावती-तिरूपती एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ही रेल्वे अनंतपूर, धर्मावरम, कादिरी, मदनापल्ले, पिलर, पाकाला या स्थानकांवरून धावणार नाही. 16 ऑगस्टला तिरुपतीहून सुटणारी तिरुपती-अमरावती एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ही रेल्वे रेणीगुंठा गुत्तीमार्गे धावेल. त्यामुळं प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळं या दोन्ही ट्रेननं प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांनी योग्य नियोजन करणं महत्त्वाचं आहे.

Published by: Suraj Sakunde
First published: August 13, 2022, 2:42 PM IST

ताज्या बातम्या