गुलाबी थंडीत कॅम्पिंगचा प्लॅन करताय? मुंबईच्या जवळची ही ठिकाणे सर्वोत्तम

गुलाबी थंडीत कॅम्पिंगचा प्लॅन करताय? मुंबईच्या जवळची ही ठिकाणे सर्वोत्तम

थंडीच्या दिवसात कॅम्पिंग करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. जर तुम्ही मुंबईजवळ कॅम्पिंगसाठी उत्तम स्थळ शोधत असाल तर तुमच्यासाठी आम्ही भन्नाट जागा घेऊन आलो आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : थंडीच्या दिवसात कॅम्पिंग करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. कामाच्या व्यापातून दूर जात निसर्गाचा अनुभव घेणं हे शब्दात वर्णन करता येणारं नाही. प्रत्येकवेळी कॅम्पिंगसाठी दूरच जावं असं काही नाही. तुमच्या शहराच्या आसपासही अशी अनेक सुंदर ठिकाणं असतात जिथं निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद तुम्ही लुटू शकता. जर तुम्ही मुंबईचे असाल आणि वीकेंड कॅम्पिंगची योजना आखत असाल, तर तुम्ही तुमच्या परिसरातील अनेक ठिकाणे एक्सप्लोर करू शकता, कारण मुंबईच्या बाहेरील भागात कॅम्पिंग करणे शक्य आहे.

खरं तर, शहरात काही तासांच्या अंतरावर भरपूर कॅम्पिंग पर्याय आहेत. जिथे तुम्ही शहरी जीवनापासून दूर वेळ घालवू शकता, चांदणं पाहू शकता आणि शक्य तितक्या चांगल्या प्रकारे निसर्गाशी कनेक्ट होऊ शकता. तुम्हालाही कॅम्पिंग आवडत असेल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला मुंबईजवळील काही उत्तम कॅम्पिंग ठिकाणांबद्दल सांगत आहोत.

कर्नाळा

मुंबईपासून 48 किलोमीटर अंतरावर वसलेले हे कॅम्पिंगसाठी उत्तम ठिकाण तर आहेच पण इतर अनेक कारणांसाठीही ते लोकप्रिय आहे. तुम्ही इथे असाल तर कर्नाळा पक्षी अभयारण्याला जरूर भेट द्या. येथे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. येथे तुम्हाला देशी पक्ष्यांच्या 150 हून अधिक प्रजाती आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या 37 प्रजाती पाहण्याची संधी मिळेल. याशिवाय कर्नाळा तलावात बोट राईडचाही आनंद लुटता येतो. हिवाळ्यात कर्नाळ्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो.

वासिंद

मुंबईच्या आसपास रात्री कॅम्पिंगसाठी वासिंद हे उत्तम ठिकाण आहे. हे मुंबईपासून 63 किलोमीटर अंतरावर आहे. येथील वातावरण अतिशय शांत आणि आल्हाददायक आहे. येथे नियमित कॅम्पिंगव्यतिरिक्त, तुम्ही इतर जलक्रीडा जसे की रिव्हर राफ्टिंग इत्यादींचा आनंद घेऊ शकता. दुसरीकडे, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही माहुली किल्ल्यापर्यंत ट्रेक देखील करू शकता. जर तुम्ही ड्राईव्हने गेलात तर एक-दोन तासात तुम्ही इथे पोहोचाल. तुम्ही येथे कधीही भेट देऊ शकता. मात्र, उन्हाळ्यात भेट देणे टाळा कारण दुपारी खूप उष्णता असते.

भातसा धरण

भातसा धरण मुंबईपासून 93 किलोमीटर अंतरावर आहे. कॅम्पिंगसाठी हे एक चांगले ठिकाण मानले जाते, कारण येथे तुम्ही पोहणे, बोट चालवणे, अगदी मासेमारीचा आनंद घेऊ शकता. मुंबईपासून फार दूर नसल्यामुळे, भातसा कॅम्पिंग साईट एका दिवसाच्या सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. भातसाला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे जून ते सप्टेंबर, कारण पावसाळ्यात तलाव भरतात आणि इथे हिरवळ दिसते.

काशीमधील 'या' मंदिरामध्ये विवाह करण्यासाठी दूरवरुन येतात लोक! काय आहे कारण?

शिरगांव बीच

पालघरमधील शिरगाव बीच मुंबईपासून 116 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रकिनाऱ्यावर एक लहान कॅम्पिंग स्पॉट आहे, जिथे आपण सुंदर समुद्राच्या वाऱ्याचा आनंद घेत आराम करू शकता. तुम्ही कॅम्पसमध्ये रात्री तारे पाहण्याचा आनंद देखील घेऊ शकता. याशिवाय पोहण्यापासून ते समुद्रकिनाऱ्यावरील क्रीडा उपक्रमही येथे करता येतात. मुलांसाठी येथे काही उंट आणि ATV बाईक राइड्स आहेत. वर्षभर हवामान खूप छान असले तरी पावसाळ्यात जाणे टाळावे.

पवना लेक

तुम्हाला पवना तलावात साहसी खेळ करण्याची संधी मिळणार नाही. मात्र, तुम्ही येथे गेल्यास तलावात पोहता येईल आणि काही जलक्रीडेचा आनंद घेता येईल. हे ठिकाण मुंबईपासून 117.3 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर ट्रेकिंग करायचं असेल तर जवळच असलेला तिकोना किल्ला बघायला जा. पवना तलावात अनेक कॅम्पिंग ठिकाणे आहेत जिथे काही दिवसांसाठी तंबू भाड्याने घेता येतात. या तंबूंचे बुकिंगही ऑनलाइन करता येणार आहे. पावसाळ्यानंतर येथे भेट देण्याचा उत्तम काळ आहे. त्यावेळी इथे सगळीकडे फक्त हिरवाई दिसते.

Published by: Rahul Punde
First published: December 15, 2021, 8:32 PM IST

ताज्या बातम्या