या मंदिरात प्रसादात मिळतात मासे! इथे माणसांसोबत श्वानांनाही आहे परवानगी, कारण वाचून अचंबित व्हाल

या मंदिरात प्रसादात मिळतात मासे! इथे माणसांसोबत श्वानांनाही आहे परवानगी, कारण वाचून अचंबित व्हाल

नदीच्या काठावर वसलेले परशशिनिकडव श्री मुथप्पन मंदिर जेवढे सुंदर आहे, तेवढेच ते परंपरेतही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

  • Share this:

मुंबई, 21 फेब्रुवारी : भारताला मंदिरांचा देश म्हणतात. कोट्यवधी भारतीयांची श्रद्धा मंदिरांसोबत जोडलेली आहे. देशातील प्रत्येक राज्यातील लोकांची वेगळी श्रद्धा पाहायला मिळते. विशेष म्हणजे सर्व मंदिरांमध्ये भाविकांकडून विविध प्रकारचा प्रसाद दिला जातो. प्रत्येक मंदिरात प्रसाद सामान्य असेलच असे नाही, कारण अनेक मंदिरांमध्ये प्रसाद खूप वेगळा असतो. तुम्हाला तो पाहून आश्चर्य वाटेल, परंतु प्रत्येक प्रसादाशी संबंधित काही कथा आहेत. आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका मंदिरांबद्दल सांगणार आहोत, जेथील प्रसादही खूप प्रसिद्ध आहेत.

भारतातील विविधतेचा अंदाज येथील मंदिरांवरून येतो. केवळ या मंदिरांमध्येच नाही, तर ते त्यांच्या सजावट आणि श्रद्धेमध्ये देखील एकमेकांपेक्षा खूप भिन्न आहेत. या मंदिरांमध्ये प्रसादाचे वेगळे महत्त्व आहे. फळे, लाडू, पुरी यांसारख्या गोष्टी प्रसादाच्या स्वरूपात मिळतात, हे तुम्हाला माहिती असेल. पण, तुम्ही कधी प्रसादात मासे देताना पाहिले आहे का? केरळच्या मुथप्पन मंदिरात प्रसादात मासे दिले जातात. हे विचित्र वाटत असले तरी खरं आहे. इतकेच नाही तर या मंदिराशी संबंधित अनेक अनोख्या गोष्टी आहेत, ज्या जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. नदीच्या काठावर असल्‍याने हे मंदिर जेवढे सुंदर आहे तितकेच ते परंपरेतही वेगळे आहे. चला जाणून घेऊया या मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी.

परशशिनिककडवा श्री मुथप्पन मंदिराच्या मनोरंजक परंपरा

मुथप्पन मंदिर केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील तालिपरंबापासून 10 किमी अंतरावर वालापट्टनम नदीच्या काठावर आहे. या मंदिराचे दैवत श्री मुथप्पन आहे. लोकांच्या मते, मुथप्पन हे येथील प्रमुख देवता असून ते भगवान शिव आणि विष्णूचे अवतार मानले जातात. स्थानिक लोकांच्या मते येथील लोकदेवता असहाय्य आणि दुर्बलांच्या हिताचे रक्षण करतात. मंदिरात येणाऱ्या लोकांना मोफत जेवण तर दिले जातेच पण त्यांना राहण्यासाठी निवाऱ्याचीही सोय आहे. मंदिरात दर्शनानंतर उकडलेले काळे फणस आणि चहा लोकांना दिला जातो. ज्याला तिथले लोक प्रसादम म्हणतात. विशेष म्हणजे या मंदिरात माणसांशिवाय कुत्र्यांनाही परवानगी आहे. कारण ते भगवान मुथप्पनचे वाहन आहेत, म्हणून त्यांना पवित्र मानले जाते.

परशशिनिककडवा श्री मुथप्पन मंदिर हे कुन्नूरचा वारसा मानले जाते. प्रसादाव्यतिरिक्त मासे आणि ताडी यासारख्या गोष्टी भगवान मुथप्पनला अर्पण केल्या जातात, ज्या नंतर लोकांमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जातात. विशेष म्हणजे हिंदू मंदिर असूनही ते विविध धर्म, जाती आणि प्रांतातील लोकांना आकर्षित करते. मंदिराच्या आवारात कलाकार कथकली सारखे लोकनृत्य सादर करतात. कलाकार विविध पौराणिक पात्रांच्या कथा त्यांच्या नृत्यातून चित्रित करतात. थीयम येथे खूप प्रसिद्ध आहे, लोकनृत्य सादर केल्यानंतर, कलाकार देखील लोकांना आशीर्वाद देतात.

ऋषिकेश ते केरळपर्यंत भारतातील ही 10 ठिकाणे परदेशी लोकांची पहिली पसंती

मंदिरापर्यंत जाण्यासाठी अनेक मार्ग

कुन्नूर रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर, तुम्ही बस, टॅक्सी इत्यादीने परशशिनिककडवा येथे पोहोचू शकता. यात तुम्हाला अर्धा तास किंवा एक तास लागेल. कुन्नूरमधील या मंदिराशिवाय अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही इच्छित असल्यास भेट देऊ शकता. समुद्रकिनारा, संग्रहालय, वन्यजीव अभयारण्य इत्यादींचा यात समावेश आहे. मात्र, याव्यतिरिक्त येथे सुंदर आहे ते म्हणजे नैसर्गिक सौंदर्य, ज्यामुळे तुम्हाला येथे पुन्हा पुन्हा यायला आवडेल.

Published by: Rahul Punde
First published: February 21, 2022, 9:12 PM IST

ताज्या बातम्या