मराठी बातम्या /बातम्या /travel /

Indigo Airways : भारतात येणारे विमान अचानक पाकिस्तानात लँड नेमकं असं काय घडलं?

Indigo Airways : भारतात येणारे विमान अचानक पाकिस्तानात लँड नेमकं असं काय घडलं?

पाकिस्तानच्या कराचीत हे विमान सुरक्षित उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे इंडिगो एअरवेजकडून सांगण्यात आले.

पाकिस्तानच्या कराचीत हे विमान सुरक्षित उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे इंडिगो एअरवेजकडून सांगण्यात आले.

पाकिस्तानच्या कराचीत हे विमान सुरक्षित उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे इंडिगो एअरवेजकडून सांगण्यात आले.

  • Published by:  Sandeep Shirguppe

नवी दिल्ली, 17 जुलै : शारजाह येथून हैदराबादला येणारे एअर इंडिगोचे विमान अचानक  पाकिस्तानकडे वळवण्यात आले. विमानात अचानक अशा काही घटना घडल्या कि ते विमान पाकिस्तानमध्ये सावधगिरीने लँडिंग करण्यात आले. दरम्यान पाकिस्तानच्या कराचीत हे विमान सुरक्षित उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे इंडिगो एअरवेजकडून सांगण्यात आले. (Indigo Airways)

शारजाहून हैदराबादला जाणारे इंडिगो फ्लाइट 6E-1406 अचानक कराचीला वळवण्यात आले. विमानाने उड्डान केल्यावर वैमानिकाला तांत्रिक दोष आढळून आला. वैमानिकाने आवश्यक त्या शक्यता तपासल्या तरीही विमानात कोणतीही सुधारणा होत नसल्याने  खबरदारी म्हणून विमान कराचीला वळवण्यात आले. दरम्यान विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दुसऱ्या विमानाची सोय करण्यात आली आहे. याबाबतची माहिती हैदराबाद विमाना विभागाकडून देण्यात आली आहे.

हे ही वाचा : 'दिआ तो कब्र पर भी जल रहा है..वेट अँड वॉच'; तो फोटो शेअर करत संजय राऊतांचं सूचक ट्विट

प्रशासनातील सूत्रांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरबसने इंजीन 2 मध्ये किंवा विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये बिघाड आढळल्यानंतर सावधगिरीने लँडिंग करण्यात आले. दरम्यान विमानातील कोणत्याही प्रवाशाला त्रास नसल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांना सुखरूप हैदराबादमध्ये पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मागच्या दोन आठवड्यांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती

DGCA ने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीवरून दुबईला जात होतं. पण अचानक डाव्या बाजूच्या टँकमधील इंधन कमी असल्याचं अलार्म मिळाल्याने या विमानाचे इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. या संबंधी कराची विमानतळाशी संपर्क केला आणि त्यानंतर हे लॅन्डिंग करण्यात आलं. नंतर निरीक्षण केल्यानंतर या टॅंकमध्ये कोणतेही लीक नसल्याचं स्पष्ट झालं. या विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती DGCA ने दिली आहे.

हे ही वाचा : Dhananjay Munde and Pankaja Munde : मुंडे भावा बहिणींमध्ये ट्वीटर युद्ध विकासकामावर दोघांचा दावा, निधी जाणार परत?

विमानाचं सुरक्षित लॅन्डिंग

स्पाईसजेटच्या प्रवक्ताने या बातमीवर खुलासा करताना सांगितलं की, या वेळी कोणत्याही इमर्जन्सी स्थिती जाहीर न करता ही लॅन्डिंग एखाद्या सामान्य परिस्थितीप्रमाणे करण्यात आली. विमानात अशा प्रकारची खराबी असेल अशी कोणतीही माहिती किंवा सूचना आधी देण्यात आली नव्हती. प्रवाशांची काळजी घेतली जात आहे. या प्रवाशांना दुबईपर्यंत नेण्यासाठी एका पर्यायी विमानाची सोय करण्यात येत आहे. 

First published:

Tags: Airplane, Airport, Pakistan, Travel by flight

पुढील बातम्या