आता Whatsapp वर मिळणार ट्रेनचं लाइव्ह स्‍टेटस, गाडीत बसून ऑनलाईन ऑर्डर करा फूड

आता Whatsapp वर मिळणार ट्रेनचं लाइव्ह स्‍टेटस, गाडीत बसून ऑनलाईन ऑर्डर करा फूड

आता प्रवाशांना व्हॉट्सअ‍ॅपवरून ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर तपासता येणार आहे.

  • Share this:

whatमुंबई, 28 सप्टेंबर : तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता प्रवाशांना व्हॉट्सअ‍ॅपवरून ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर तपासता येणार आहे. मुंबईस्थित स्टार्टअप रेलॉफीने हे नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरून तुमच्या प्रवासाची सर्व माहिती मिळवू शकाल. या एका फीचरच्या मदतीने युजर्सना ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर तपासण्यासाठी वेगवेगळे अॅप डाउनलोड करावे लागणार नाहीत.

व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर चॅटबॉटच्या मदतीने चालते. चॅटिंगद्वारे नंबर टाईप केल्यानंतरच ट्रेन आणि प्रवासासंबंधीची सर्व माहिती प्रवाशाला उपलब्ध होईल. इतकंच नाही तर IRCTC प्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना 139 हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे. याच्या मदतीने एक स्टेशन अगोदर येणारे स्टेशन आणि इतर तपशील मिळतील.

थेट ट्रेनची स्थिती कशी तपासायची

सर्वप्रथम तुमच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये Railofy चा WhatsApp चॅटबॉट नंबर 91-9881193322 सेव्ह करा.

व्हॉट्सअ‍ॅप ऍप्लिकेशन अपडेट करा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा.

त्यानंतर तुम्ही फोनमध्ये सेव्ह केलेल्या Railofy च्या चॅटबॉट नंबरच्या चॅट विंडोवर जा.

चॅट बॉक्समध्ये 10 अंकी PNR क्रमांक पाठवा.

Railofy चॅटबॉट तुम्हाला रिअल टाइम अलर्ट आणि ट्रेनचे तपशील पाठवण्यास सुरुवात करेल.

वाचा - Vande Bharat Train: चक्क बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं धावते ‘ही’ भारतीय ट्रेन, वाचा कुणालाच माहित नसलेल्या खास गोष्टी

रेल्वे प्रवासादरम्यान ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवता येणार

IRCTC रेल्वे प्रवासादरम्यान ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याची सुविधा देखील प्रदान करते. यासाठी प्रवाशांना फोनमध्ये IRCTC अॅप Zoop डाउनलोड करावे लागेल. या अॅपच्या मदतीने सीटवरच आवडते खाद्यपदार्थ मागवता येतात.

जेवण ऑर्डर करण्याची प्रक्रिया

Zoop चा WhatsApp चॅटबॉट नंबर 91 7042062070 तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.

आता व्हॉट्सअॅपमध्ये जूप चॅटबॉट विंडो उघडा.

येथे तुमचा 10 अंकी PNR क्रमांक टाका आणि तुम्हाला जेथून जेवण ऑर्डर करायचे आहे ते येणारे स्टेशन निवडा.

Zoop तुम्हाला चॅटबॉटवर रेस्टॉरंटची यादी दाखवेल. जेवण ऑर्डर करण्यासाठी या रेस्टॉरंटपैकी एक निवडा आणि तुमचे फूड बिल ऑनलाइन भरा.

तुम्ही चॅटबॉटवर तुमच्या फूड ऑर्डरचाही मागोवा घेऊ शकता.

Published by: Rahul Punde
First published: September 28, 2022, 10:36 PM IST
Tags: train

ताज्या बातम्या