ट्रॅव्हल्स तिकिटाच्या किंमतीत तुम्हीही विमान प्रवास करू शकता! वाचा सोप्या टीप्स

ट्रॅव्हल्स तिकिटाच्या किंमतीत तुम्हीही विमान प्रवास करू शकता! वाचा सोप्या टीप्स

how to book cheap plane tickets : विमानांची तिकीटे महाग असल्याने अनेकजण इच्छा असूनही प्रवास करणे टाळतात. मात्र, तुम्ही थोडं डोकं लावलं तर तुम्हीही अगदी ट्रव्हल्सच्या किमतीत विमान प्रवास करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहोत.

  • Share this:

मुंबई, 17 डिसेंबर : अनेकांची विमानातून प्रवास (Flight) करायची खूप इच्छा असते. अवकाशातून खालचा प्रदेश पाहणे ही मजा काही औरच. महत्वाचं म्हणजे वेळेची प्रचंड बचत होते. देश-विदेशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही काही तासांमध्ये पोहचू शकता. पण, विमानप्रवास प्रत्येकवेळी खिशाला परवडेलच असं नाही. परिणामी अनेकदा इच्छा आणि गरज असताना लोकं विमान प्रवास करणे टाळतात. मात्र, आता पूर्वीसारखा विमानप्रवास महाग राहिलेला नाही. यातही थोडा अभ्यास केला तर तुम्हीही स्वस्तात (cheap plane tickets) जगभर फिरू शकतात. आता तुम्ही म्हणाल अभ्यास म्हणजे आणि तो कसा करायचा? काळजी करू नका, यासाठी आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स देणार आहोत.

संपूर्ण महिन्याच्या तारखा तपासा

जर तुम्ही तुमच्या तारखा लवचिक (Flexible) ठेवू शकत असाल तर स्वस्त फ्लाइट तिकीट बुक करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असू आहे. वास्तविक बर्‍याचवेळा आपण एकाच तारखेला अनेक गोष्टी शोधतो आणि मग जेव्हा फ्लाइट तिकिटांचा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला त्या तारखांची तिकिटे महाग पडतात. जर तुम्ही सहलीला जात असाल, तर आधी तारखांनुसार हॉटेल, फ्लाइट इत्यादी शोधण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्हाला डायनॅमिक किंमतीची कल्पना येईल. त्यानंतर तुमच्या आवडीची तारीख निवडा आणि किंमतींची तुलना करायला विसरू नका. ज्या दिवशी स्वस्तात तिकीट मिळत असेल तो दिवस निवडा.

ब्रेक प्रवास करण्याचा प्रयत्न करा Break Journey

समजा तुम्हाला हैदराबादहून दिल्लीला जायचे आहे. यासाठी तुम्ही नॉन-स्टॉप फ्लाइटची निवड केली. पण, त्याचवेळी तुम्हाला हैदराबाद ते पुण्याची फ्लाइट खूप स्वस्त मिळाली, ज्याचा दिल्लीला थांबा आहे. अशा परिस्थितीत हैदराबाद ते पुण्याचे तिकीट काढून तुम्ही दिल्लीत उतरू शकता. नियमित विमानाने प्रवास करणारे प्रवासी ही ट्रीक वापरतात.

फ्लाइट आणि टूर शोधताना नेहमी इनकॉग्निटो विंडोमध्ये सर्च करा Flight Search

गुगल तुमची सर्व हिस्ट्री ट्रक करत असते. त्यानुसार तुम्हाला जाहिराती दाखवत असते. अशा परिस्थितीत, तुमची हिस्ट्री लपवा आणि इन्कॉग्निटो मोडमध्ये शोधणे हा एक चांगला पर्याय असेल. जेव्हा तुमच्या ब्राउझरमध्ये कुकीज (इंटरनेट कुकीज) तयार केल्या जातात, तेव्हा तुम्हाला त्या तारखांना अधिक महाग फ्लाइट तिकिटे दिसतात. यामुळे तुम्हाला विमानप्रवास महागाड पडू शकतो. तुमचा टूर संबंधित सर्च नेहमी इनकॉग्निटो मोडमध्ये करा.

गुलाबी थंडीत कॅम्पिंगचा प्लॅन करताय? मुंबईच्या जवळची ही ठिकाणे सर्वोत्तम

फ्लाइट पॉइंट आणि क्रेडिट कार्ड Flight points and credit cards

अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड पॉइंट्सच्या रूपात मोफत फ्लाइट माईल ऑफर करतात हे अनेकांना माहिती नसते. अशा परिस्थितीत तुमच्याकडे फ्लाइट तिकीट स्वस्त करण्याचा पर्याय असतो, पण, याची तुम्हाला माहिती नसते. तुमच्या कार्डचे नियम आणि अटी एकदा वाचा आणि मग ज्या कार्डवर जास्तीत जास्त सूट मिळत आहे ते कार्ड वापरा.

एअरलाइन्स प्राईज अलर्ट Airlines price alert

स्वस्त फ्लाइट तिकिटांसाठी तुम्ही फ्लाइट अलर्टचे सदस्यत्वही घेऊ शकता. GoAir, Air Asia, Jetstar, Indigo, SpiceJet सारख्या कंपन्या त्यांच्या सोशल मीडिया पेजवर नेहमीच जाहिराती देत ​​असतात. कारण त्यांना त्यांच्याकडे ग्राहक आणावे लागतात. काहीवेळा तुम्ही 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत फ्लाइट तिकीट मिळवू शकता. यापूर्वी स्पाईसजेटकडून असे अनेक पर्याय उपलब्ध होते. म्हणून, सर्व एअरलाइन्सची सोशल मीडिया पेज देखील तपासा जेणेकरुन तुम्हाला सध्याच्या ऑफरची माहिती मिळेल.

Published by: Rahul Punde
First published: December 17, 2021, 5:51 PM IST

ताज्या बातम्या