- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
Kerala Vacation: ऑफ-सीझनमध्ये केरळला भेट द्या अन् फायदाच फायदा घ्या!

केरळसारखे (Kerla) सुंदर ठिकाण पाहण्यासाठी ऑफ सीझन (Off Season) योग्य आहे. या काळात तुम्ही केरळला गेलात तर तुमचा फायदाच फायदा आहे.
- News18 Lokmat
- Last Updated: Jan 18, 2022 07:48 PM IST
मुंबई, 18 जानेवारी : आजकाल सुट्टीत (Holiday) फिरायला जाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. बर्याचदा लोकं सुटीच्या दिवशी किंवा लाँग वीकेंडला (Weekend) प्रवास करण्याचा बेत आखतात. यामुळेच बहुतेक लोकप्रिय पर्यटन स्थळांवर या दिवसांत गर्दी पाहायला मिळते. मात्र, गर्दीमुळे फिरण्याचा आनंद मनोसक्त घेण्यावर मर्यादा येतात. मागणी जास्त असल्याने महाग विमान तिकिटे, गर्दीमुळे महागडे हॉटेल भाडे, अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. पण जर तुम्ही ऑफ सीझनमध्ये (Off Season) अशा ठिकाणी गेलात तर तुम्हाला अशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही. विशेष म्हणजे तुम्ही स्वस्तात प्रवासाचा आनंद घेऊ शकता. जर तुम्ही ऑफ सिजनमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर केरळ (Kerala Vacation) तुमच्यासाठी योग्य ठिकाण ठरू शकते. ऑफ सिजनमध्ये केरळमध्ये गर्दी कमी-अधिक असते. शिवाय आणखीही काही फायदे आहेत.
विमान भाडे आणि हॉटेल्सवर 40-60% सूट
या काळात तुम्हाला मुंबईहून केरळला तीन दिवस सुट्टीवर जायचे झाले तर विमान भाडे 2000 ते 4000 रुपयापर्यंत असेल. त्याचप्रमाणे तुम्हाला येथील पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये देखील 40-60 टक्के सूट मिळेल.
छान हवामानाचा आनंद घ्या
देशात सध्या थंडीचा मोसम शिगेला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यानंतर केरळच्या आसपास पसरलेली हिरवाई आणि सुंदर दृश्यांचा आनंद लुटता येतो. यासोबतच सुंदर धबधब्यांच्या आसपास निवांत क्षण घालवणे आणि हिरव्यागार दऱ्याखोऱ्यांना भेट देणे हाही एक अनोखा अनुभव आहे.
स्वस्त प्रवास मजा
केरळमध्ये प्रवास करण्यापासून ते विविध कामांसाठी ऑफ सीझनमध्ये दर थोडे कमी द्यावे लागतात. उदाहरणार्थ, हाउसबोटवर फिरणे, शिकारा राइडवर जाणे, स्नेक बोट रेसचा अनुभव घेणे आणि साहसी क्रियाकलापांचा आनंद घेणे हे देखील तुमच्या बजेटमध्ये आहे.
आयुर्वेदिक थेरपीचा आनंद घ्या
केरळमध्ये आढळणारी आयुर्वेदिक चिकित्सा इतकी प्रभावी आहे की ती तिच्या जागतिक दर्जाच्या सेवांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटक येथे मसाज करून आराम करण्यासाठी येतात. तुम्हालाही ऑफ सीझनमध्ये इथे येऊन मसाज करून आराम मिळवायचा असेल तर कमी पैशात मिळतो. कमी गर्दीमुळे, तुम्हाला चांगल्या सेवा मिळतात आणि तुम्ही त्यांचा आरामात आनंद घेऊ शकता.
निवांतपणा पर्यटन करा
केरळच्या सुंदर दऱ्या पाहण्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही शांततेच्या वातावरणात असता. ऑफ-सीझनमध्ये, तुम्ही इथल्या सुंदर मैदानी भागात मुक्तपणे फिरू शकता आणि तुमच्या विश्रांतीमध्ये कोणीही अडथळा आणणार नाही. पर्वतांपासून समुद्र किनार्यापर्यंतचे उत्तम लँडस्केप पाहताना तुम्ही येथे चालण्याचा आनंद घेऊ शकता.