Goa Tourism : गोवा फिरण्यासाठी जातायेत? 'या' ठिकाणी होईल मोफत राहण्याची सोय

Goa Tourism : गोवा फिरण्यासाठी जातायेत? 'या' ठिकाणी होईल मोफत राहण्याची सोय

अथांग पसरलेला समुद्र, निळंशार पाणी, चमचमणाऱ्या वाळूचे किनारे आणि नारळाच्या बागा, गोव्यातंल हे निसर्गसौंदर्य देशीच नव्हे, तर परदेशी पर्यटकांनाही आपल्याकडे आकर्षित करत.

  • Share this:

पणजी, 15 डिसेंबर : अथांग पसरलेला समुद्र, निळंशार पाणी, चमचमणाऱ्या वाळूचे किनारे आणि नारळाच्या बागा, गोव्यातंल हे निसर्गसौंदर्य देशीच नव्हे, तर परदेशी पर्यटकांनाही आपल्याकडे आकर्षित करत असतं. ख्रिसमस आणि नवीन वर्षी गोव्यामध्ये सुट्ट्या व्यतीत करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. या काळात पर्यटकांची अगदी झुंबड उडत असते. परंतु, गोव्याला जायचं म्हटलं की, बजेटचा विचार करावा लागतो. तिथं राहणं आणि फिरण्यासाठी बराच खर्च लागतो; पण गोव्यात मोफत राहता येऊ शकतं, असं म्हटलं तर कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु ही बाब शक्य आहे. यासाठी काही नियम पाळावे लागतील. त्याबद्दल जाणून घेऊ यात.

मोफत राहण्याची व्यवस्था 

गोव्यामध्ये पर्यटनाला जायचं म्हटलं, तर एखादी गोष्ट तिथं मोफत मिळेल याबद्दल विचारसुद्धा केला जाऊ शकत नाही. तिथं राहण्या-खाण्यापासून फिरण्यापर्यंत अमाप पैसा खर्च करावा लागतो; पण अशा परिस्थितीतही काही ठिकाणी मोफत राहण्याची व्यवस्था होऊ शकते. परंतु त्यासाठी तुम्हाला काही प्रमाणात कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल.

'या' हॉस्टेलमध्ये राहता येईल मोफत

गोव्यात ‘पापी चुलो’ नावाचं हॉस्टेल आहे. तिथे तुम्हाला एका व्हॉलंटियरप्रमाणे राहता येऊ शकतं. अशा प्रकारच्या हॉस्टेल्समध्ये काम करणाऱ्यांची संख्या फारच कमी असते. अशा वेळी तुम्ही तिथे राहून कामात सहकार्य करू शकता. तिथल्या माणसांना मदत करून तुमच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. विशेष म्हणजे काम केलं तर तुमच्याकडून पैसेही घेतले जात नाहीत.

मोफत राहण्यासाठी काय करावं लागेल?

व्हॉलंटियर म्हणून तुम्हाला ‘पापी चुलो’त राहत असताना बार अटेंडिंग, रिसेप्शन, हेल्प डेस्क, हाउसकीपिंग आणि टूर गाइड अशा पद्धतीची कामं करावी लागतात. हॉस्टेलमध्ये काम करणाऱ्या स्टाफची कमतरता असते. त्यामुळे इथं काम करून वेगळा अनुभवही घेता येऊ शकतो. हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य पर्यटक येतात. त्यांच्याशी चर्चा करून नवीन मित्र शोधण्याचा एक वेगळा अनुभवही तुम्हाला घेता येईल.

मोफत फिरण्याचा आनंद  

गोवा फिरत असताना बजेट फार कमी असलं, तरी अनेक असे समुद्रकिनारे आहेत जिथे तुम्ही मोफत निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता. गोव्यातले समुद्रकिनारे खेळाच्या मैदानाप्रमाणे आहेत. उत्तर गोव्यात अरामबोल किनारा, तसंच दक्षिण गोव्यात काणकोण समुद्रकिनाऱ्यावर वाटेल तेवढा वेळ पाण्यात खेळू शकता, किनाऱ्यावर सूर्यप्रकाशात बसू शकता. याला सनबाथही म्हटलं जातं. परदेशी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सनबाथचा आनंद घेतात. तुम्हाला शंख, शिंपल्यांची आवड असेल तर या किनाऱ्यावर असंख्य शंख, शिंपलेही गोळा करता येतील.

हेही वाचा :  Snakes Facts : मृत्यूनंतरही धोकादायक ठरू शकतो साप, शिकार पचवण्यात लागतात काही दिवस

कासवांचं नैसर्गिक घर पाहण्याची संधी

गोव्याला निसर्गाने भरभरून दिलं आहे. तिथले समुद्रकिनारे भुरळ घालत असतात. उत्तर गोव्यात मोरजी आणि मंड्रेमचा किनारा आणि दक्षिण गोव्यामध्ये अगोंडा आणि गलगीबागा किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवं आढळतात. या कासवांचं नैसर्गिक घरही तुम्हाला इथं पाहता येईल. निसर्गाच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांशी जोडलं जाऊन काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

हेही वाचा :  Aurangabad : औरंगाबादमधील लग्नांवर विराट-अनुष्काचा प्रभाव, पाहा Video

रात्रीच्या वेळी शॉपिंगचा आनंद

रात्र झाल्यानंतर गोव्याचं सौंदर्य आणखी वेगळं असतं. अरपोरामध्ये सॅटर्डे नाइट मार्केट आणि बागामध्ये मॅकीज नाइट मार्केट अतिशय उत्तम आहेत. तिथं शॉपिंग करण्याचा आनंद काही वेगळाच ठरू शकतो. याशिवाय गोव्यामध्ये फेब्रुवारीच्या महिन्यात गोवा कार्निव्हल आयोजित करण्यात येतो. यात गोव्याची संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडतं. तीन दिवसांच्या या महोत्सवात विविध कलांचा आनंद घेता येतो. महोत्सवात डान्सर म्युझिशियन आणि कलाकारांना वेगवेगळ्या वेशभूषेत पाहण्याचा अनुभव काही औरच असतो. विशेष म्हणजे अगदी मोफत या महोत्सवाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

First published: December 15, 2022, 3:00 PM IST
Tags: goa

ताज्या बातम्या