- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हनिमून डेस्टिनेशन नाही तर 'या' कारणांसाठी पर्यटक सर्वात जास्त उटीला भेटा देतात!

Ooty hill station best places to visit : जेव्हा संपूर्ण देशभरात गरमागर्मी असते, तेव्हा दक्षिण भारतातील एका शहराचं हवामान आणखीनच आल्हाददायक होतं. या शहरातील तापमान कधीही 25 अंशांच्या वर जात नाही. हे दक्षिणेतील एकमेव हिल स्टेशन आहे. याला भारतातील सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशनपैकी एक म्हटलं जातं.
- News18 Lokmat
- Last Updated: Dec 29, 2021 08:42 PM IST
उटी, 8 डिसेंबर : दक्षिण भारतातील तमिळनाडू (tamilnadu) राज्यातील जगप्रसिद्ध उटी (Ooty) शहर निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. नवविवाहित जोडप्यांना हनिमूनसाठी (honeymoon) हे एक उत्तम डेस्टिनेशनही मानले जाते. उटी येथील निलगिरी पर्वतरांगा (Nilgiri Mountain) पाहण्यासारख्या आहेत. कदाचित त्यामुळेच या हिल स्टेशनला पर्वतांची राणी असेही म्हणतात. जुन्या काळी याला उटकमंड आणि उदगमंडलम म्हटलं जायचं. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमेवर वसलेले हे शहर निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे. उटीला जाण्याची आणखीही काही कारण आहेत. इथं येण्यासाठी योग्य काळ कोणता? आणि पोहचण्यासाठी पर्याय कोणते? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढील काही मिनिटांत मिळतील.
इथलं वातावरण वर्षभर आल्हाददायक असलं तरी हिवाळ्यात मात्र वातावरण खूप थंड होतं. हिवाळ्यात इतकं धुकं पडतं की जवळ उभ्या असलेल्या लोकंही आपल्याला दिसत नाही. उटीजवळील निलगिरी टेकड्यांमुळे त्याचे सौंदर्य अधिक वाढते. निलगिरी टेकड्यांना ब्लू माउंटन असेही म्हणतात. या टेकड्यांवर निळी फुले येतात, त्यामुळे येथील दऱ्या निळ्या फुलांमुळे निळ्या पर्वतासारख्या बनतात, जे खूप सुंदर दिसतात. उटी हे चहाच्या बागांसाठीही प्रसिद्ध आहे.
उटी येथील रोझ गार्डनमध्ये पर्यटकांना असे गुलाब पाहायला मिळतात, जे त्यांनी याआधी कधीही पाहिले नव्हते. भारतातील ही सर्वात मोठी गुलाबाची बाग असल्याचे सांगितले जाते. उटीचे तलाव आणि निलगिरीच्या डोंगररांगा मनमोहक आहेत. पर्यटक तलावात बोटिंगचा आनंदही घेऊ शकतात. नामशेष होत चाललेल्या प्रजातींचे अनेक प्राणीही येथील जंगलात पाहायला मिळतात. उटीमध्ये 'डॉल्फिन्स नोज' नावाचे एक ठिकाण आहे जे कुटुंब आणि मुलांसह भेट देण्यासाठी उत्तम आहे. इथून संपूर्ण ऊटी आणि त्याच्या सभोवतालचे दृश्य अतिशय सुंदर दिसते.
आकर्षणाचे केंद्र निलगिरी पर्वत Nilgiri Mountain
निलगिरी किंवा ब्लू माउंटनच्या रांगांमध्ये वसलेले, उटी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. हिवाळ्याव्यतिरिक्त येथील वातावरण वर्षभर आल्हाददायक असते. हिवाळ्यात तापमान शून्य अंशांच्या खाली जाते. दाट झाडी, चहाचे मळे आणि निलगिरीची झाडे, ही पर्वतांची खासियत आहे. निसर्गाच्या या सुंदर मैदानात नवविवाहित जोडपे त्यांचा हनिमून संस्मरणीय बनवण्यासाठी येतात.
अप्रतिम बोटॅनिकल गार्डन Ooty Botanical Garden
निसर्गप्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेल्या या बोटॅनिकल गार्डनची स्थापना 1847 साली झाली. 22 हेक्टरमध्ये पसरलेल्या या सुंदर बागेची देखभाल उद्यान विभागाकडून केली जाते. येथे एका झाडाचे जीवाश्म ठेवले आहेत, जे 20 दशलक्ष वर्षे जुने असल्याचे मानले जाते. याशिवाय 650 हून अधिक प्रजातींची झाडे आणि वनस्पती येथे पाहायला मिळतात.
उटी तलावात बोटिंग Ooty Lake Boating
नौकाविहारासोबतच तुम्ही उटी तलावात मासेमारीचा छंदही पूर्ण करू शकता. माशांचे खाद्य खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला मासेमारीची परवानगी घ्यावी लागेल. या ठिकाणचे पहिले कलेक्टर जॉन सुविलियन यांनी 1825 मध्ये उटी तलाव बांधला होता. हा तलाव 2.5 किमी लांबीचा आहे, याशिवाय एक बाग आणि जेटी देखील आहे. येथे दरवर्षी सुमारे 12 लाख पर्यटक येतात.
दोडाबेट्टा हे येथील सर्वोच्च शिखर
दोडाबेट्टी हे या जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर मानले जाते. हे शिखर समुद्रसपाटीपासून 2623 मीटर उंच आहे, जे ऊटीपासून फक्त 10 किमी अंतरावर आहे. इथून दरीचे अप्रतिम दृश्य दिसते. डेरेची झाडेही येथे मुबलक प्रमाणात आढळतात. मदुमलाई वन्यजीव अभयारण्य, कोटागिरी आणि कालाहट्टी धबधब्यांसह ऊटीच्या आसपास पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.
आता तुम्हीही उटीला जाण्याचा विचार करत असाल तर उटी तलावाच्या काठावर उटीच्या प्रसिद्ध हस्तनिर्मित (Hand made) चॉकलेट्सने खरेदीचा प्रवास पूर्ण करा. इथं आल्यावर चॉकलेट चाखायला विसरू नका. कारण, हे चॉकलेट जगभर प्रसिद्ध आहेत.
कसं पोहचणार? How to reach ooty from mumbai
उटीला हवाई मार्गाने पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ कोईम्बतूर आहे, जे येथून 100 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांमधून कोइम्बतूरला नियमित उड्डाणे येतात. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर, तुम्ही टॅक्सी, कॅब किंवा बसने रस्त्याने फक्त 3 तासांत ऊटीला पोहोचू शकता.
रेल्वे
मेट्टुपालयम हे उटीपासून 40 किमी अंतरावर असलेले उटीचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. मुंबईहून उटीला थेट रेल्वे गाडी नाही. तुम्हाला इथून मुख्य जंक्शन कोईम्बतूरला जावं लागेल. तिथून मेट्टुपलायमला यावं लागेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडू शकता आणि टॅक्सी किंवा कॅबद्वारे ऊटीला पोहोचू शकता. याशिवाय निलगिरी माउंटन टॉय ट्रेनमध्ये बसून, डोंगर, घनदाट जंगल आणि दऱ्याखोऱ्यांतून तुम्ही उटीला पोहोचू शकता. या प्रवासाला बराच वेळ लागत असला तरी हा आयुष्यभराचा अनुभव आहे जो तुमच्या कायम लक्षात राहील.
रोड
मुंबईहून अनेक खाजगी ट्रव्हल्स उटीला थेट जातात. तुम्हाला इथं पोहचण्यासाठी 20 ते 22 तासांचा कालवधी लागू शकतो.