लग्नाआधी Solo Travel करण्याचा विचार करताय? तर मग आधी 'हे' वाचा

लग्नाआधी Solo Travel करण्याचा विचार करताय? तर मग आधी 'हे' वाचा

एकट्याने प्रवास करणे हा एक वेगळा अनुभव असतो. अविवाहित असताना सोलो ट्रिप (Solo Trip) करणे आणि स्वातंत्र्य अनुभवणे ही काही वेगळीच गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला सोलो प्रवासाठी चांगली पर्यटनस्थळं सांगणार आहोत.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : एकट्याने फिरायला जाणे आता पूर्वीसारखे कंटाळवाणे राहिलेले नाही. उलट आता सोलो ट्रीप हा शब्द अनेकांच्या बकेट लिस्टमध्ये समाविष्ट झाला आहे. आजकाल एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. लग्नाआधी प्रत्येकाला सोलो ट्रिप करायची इच्छा असते. बजेटनुसार एकट्याने प्रवास करणं, वेगळ्या प्रकारचा अनुभव घेणं, नवीन लोकांना भेटणं, स्वातंत्र्य अनुभवणं ही काही वेगळीच गोष्ट आहे. ही सोलो ट्रिप देशात असो वा परदेशात तुमच्यासाठी परफेक्ट असते. मुलगी असो वा मुलगा सोलो ट्रिप हा वेगळा अनुभव आहे. तुम्हीही अशा सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला देश आणि विदेशातील बेस्ट डेस्टिनेशनविषयी सांगणार आहोत. ही सर्व ठिकाणे अतिशय सुरक्षित आणि सुंदर आहेत.

कोवलम, केरळ

केरळची गोष्टच निराळी आहे. जर तुम्हाला समुद्र आवडत असेल, तुम्ही सीफूडचे चाहते असाल तर केरळ तुमच्यासाठी बेस्ट डेस्टीनेशन आहे. तुम्ही येथे हाउसबोट्सचा देखील आनंद घेऊ शकता. इथे राहण्यासाठी 3 स्टार हॉटेल्सपासून ते लक्झरी बीचपर्यंत सर्व काही बजेटमध्ये उपलब्ध असेल. लाइटहाऊस बीच, कोवलम बीच, हवा बीच हे इथले सर्वात लोकप्रिय बीच आहेत.

सिक्कीम

आपल्या देशातील सर्वात सुंदर भागांपैकी एक म्हणून सिक्कीमला भेट देणे बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. कांचनजंगा पर्वतांच्या मधोमध बर्फाच्छादित शहर आणि तलाव पाहणे हा एक वेगळा अनुभव असेल. जर तुम्हाला डोंगरात फिरण्याची आवड असेल, तर इथे जाण्यासाठी बस, ट्रेन किंवा विमानाचा कोणताही मार्ग वापरता येईल.

पाँडिचेरी/पुडुचेरी

जर तुम्हाला भारतात फ्रेंच समाज अनुभवायचा असेल तर पाँडिचेरीपेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. ना खूप गर्दी ना खूप प्रदूषण, ही खूप चांगली जागा आहे. आणि हो, इथलं जेवण खरंच छान आहे. तुम्ही येथे सहजपणे रोड ट्रिपची योजना देखील करू शकता.

Sky Diving चा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

बाली

बजेटमध्ये इंटरनॅशनल ट्रिप करायची असेल तर बाली हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बाली हे फक्त हनिमून डेस्टिनेशन नाही तर तुम्ही इथे एकटेही जाऊ शकता. ही सहल खूपच बजेटफ्रेंडली आहे. त्यामुळे तुम्हाला ती नक्कीच आवडेल. बाली सौंदर्याच्या बाबतीतही कमी नाही.

साउथ आयलंड, न्यूझीलंड

साउथ आयलंड इतके सुंदर ठिकाण आहे की येथे फिरण्यासाठी बजेट थोडे वाढवावे लागेल. पण साहस आणि सौंदर्याच्या बाबतीत याला तोड नाही. राफ्टिंग, जेट बोटिंग, स्कायडायव्हिंग, बंजी जंपिंग, कयाकिंग, हायकिंग आणि बरेच काही आहे. इथे इतके सौंदर्य आहे की इथून परत जावेसे वाटणार नाही.

Varanasi | बनारसला जायचे असेल तर 'या' दिवसातच भेट द्या, जाणून घ्या कारण

कोपनहेगन, डेन्मार्क

कोपनहेगनला कोणत्याही प्रकारे कमी लेखता येणार नाही. युरोपमधील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. इथले सौंदर्य नैसर्गिक आहेच. पण हे शहर देखील रंगीत आणि आकर्षक करण्यात आले आहे. ज्या लोकांना युरोपियन खाद्यपदार्थ आणि गोड पदार्थ आवडतात त्यांच्यासाठी बेस्ट डेस्टीनेशन आहे.

Published by: Rahul Punde
First published: January 15, 2022, 7:56 PM IST

ताज्या बातम्या