- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
Travel Tips: तुम्ही ट्रॅव्हल एजंटकडून पॅकेज घेत असाल तर आधी 'हे' प्रश्न विचारा, नाहीतर होईल रंगाचा बेरंग

आजकाल ट्रव्हल एजन्सी ट्रिप पॅकेज (Travel Package) देतात. यामुळे तुम्ही प्रवासात कोणत्याही अडचणीशिवाय बिनधास्त फिरू शकता. मात्र, हे पॅकेज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. नाहीतर फिरायला गेल्यावर रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही.
- News18 Lokmat
- Last Updated: Jan 20, 2022 03:37 PM IST
मुंबई, 19 जानेवारी : प्रत्येकाला फिरायला, नवनवीन गोष्टी अनुभवायला आवडते. विशेषत: जेव्हा कुटुंब किंवा जोडीदारासोबत फिरण्याची संधी असते, तेव्हा ही संधी कोणालाही गमावण्याची इच्छा नसते. पूर्वीच्या काळी प्रवास करणं आजच्या इतकं सोयीचं नव्हतं. कारण साधन नसल्यामुळे प्रवासात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागायचं. पण, आता तसे राहिले नाही. आता प्रवासाचे अनेक मार्ग आहेत. इतकंच नाही तर आता तुम्हाला तुमच्या सहलीच्या नियोजनातही मदत मिळते. कारण आता अनेक ट्रॅव्हल एजन्सी उपलब्ध आहेत ज्या तुमच्या सहलीचे नियोजन अशा प्रकारे करतात की तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. पण, जर तुम्ही ट्रॅव्हल एजन्सीकडून ट्रिप पॅकेज घेत असाल, तर तुम्ही अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ट्रॅव्हल पॅकेज घेताना तुम्ही एजंटला काही प्रश्न नक्कीच विचारायला पाहिजे.
ठिकाणाबद्दल
सर्वात आधी तुम्हाला कुठे जायचे आहे हे ठरवा, त्याबद्दल स्वतः सर्च करा. तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही ट्रॅव्हल एजंटला तुम्ही भेटून त्या ठिकाणाविषयी इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती खरोखरच खरी आहे की नाही हे तपासावे. ट्रॅव्हल एजंटला ठिकाणाबद्दल विचारा आणि मग तुमच्या सहलीची नियोजन करा. लक्षात ठेवा ते ठिकाण खरोखर भेट देण्यासारखे असेल तरच पॅकेज घ्या.
प्लॅन कस्टमाइझ करा
आजकाल ट्रॅव्हल पॅकेज कस्टमाइझ करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. पण, तुम्हाला ट्रॅव्हल एजंटलाच विचारावे लागेल. कारण, एजंटला त्याने नमूद केलेल्या ट्रॅव्हल पॅकेजशिवाय तुम्हाला काय हवे आहे हे कसे कळेल. पॅकेज कस्टमाइझ केले जाऊ शकते का हे तुम्हाला त्याला विचारावे लागेल. जर एजंट यासाठी तयार असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार पॅकेज घ्या.
पॅकेजमधील सुविधांबद्दल चौकशी करा
ट्रॅव्हल पॅकेजमध्ये अनेक सुविधा दिल्या जातात. भटकंती व्यतिरिक्त, पॅकेजमध्ये खाण्यापिण्याशी संबंधित गोष्टी आणि आरामासाठी बरेच काही असते. पॅकेज घेताना तुम्ही एजंटला याबद्दल विचारले पाहिजे. कारण, जेव्हा तुम्हाला याबद्दल माहिती असेल तेव्हाच तुम्ही प्रवासादरम्यान त्याचा फायदा घेऊ शकाल. तसेच, जर तुम्हाला या सुविधा दिल्या जात नसतील तर तुम्ही ट्रॅव्हल एजन्सीवर दावा देखील करू शकता.
पॅकेजमध्ये काय समाविष्ट नाही
प्रत्येक ट्रॅव्हल एजन्सीचे वेगवेगळे पॅकेज असतात. पॅकेज घेण्यापूर्वी तुम्हाला एजंटला विचारावे लागेल की पॅकेजमध्ये समाविष्ट नसलेल्या कोणत्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला त्यांची स्वतः व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा लागेल. अनेक पॅकेजेसमध्ये पिक आणि ड्रॉप सेवा नसते. तर काही पॅकेजेसचे विमान भाडे नसते. तुम्हाला एजंटला याबद्दल अगोदरच विचारावे लागेल जेणेकरुन तुम्हाला त्यावेळी कोणतीही अडचण येऊ नये.
Kerala Vacation: ऑफ-सीझनमध्ये केरळला भेट द्या अन् फायदाच फायदा घ्या!
ट्रॅव्हल पॅकिंग
तुम्ही भेट देत असलेल्या ठिकाणाच्या संस्कृतीबद्दल तुम्ही एजंटला विचारू शकता. तसेच तेथील हवामान, खाद्यपदार्थ आणि कपडे याबद्दल जरूर विचारा. देश-विदेशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे राहणाऱ्या लोकांची संस्कृती वेगळी आहे. तिथे जाणाऱ्यांना ती पाळावीच लागते. अशा परिस्थितीत तुम्हाला हे आधीच माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही त्यानुसार तुम्ही पॅकिंग करू शकाल. योग्य चौकशी आणि तयारी करुन गेलात तर प्रवासात कोणत्याही अडचणीशिवाय तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता.