केवळ ताजमहालच नाही तर या इमारतीही आहेत Symbol of love, जाणून घ्या

केवळ ताजमहालच नाही तर या इमारतीही आहेत Symbol of love, जाणून घ्या

किल्ले, राजवाडे अशी इतिहासातील प्रेमाची अनेक प्रतीके आजही अस्तित्वात आहेत. या ऐतिहासिक वास्तू आजही प्रेमाचे उदाहरण म्हणून जतन करून ठेवल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : प्रेम (love) हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आजच्या काळात खरे प्रेम मिळणे फार कठीण झालं आहे. मात्र, आपण इतिहासात डोकावले तर खऱ्या प्रेमाच्या एकापेक्षा एक कथा आपल्याला पाहायला मिळतील. पूर्वीच्या लव्ह बर्ड्सनी (Love Birds) प्रेम तर केलेच पण आपले प्रेम सदैव जिवंत ठेवण्यासाठी काही आठवणीही निर्माण केल्या. किल्ले, राजवाडे अशी इतिहासातील प्रेमाची अनेक प्रतीके आजही अस्तित्वात आहेत. या ऐतिहासिक वास्तू आजही प्रेमाचे उदाहरण म्हणून जपून ठेवल्या आहेत. प्रत्येक इमारतीची स्वतःची कथा आहे. काही प्रेमाशी संबंधित आहेत, काही प्रेमातल्या त्यागाशी निगडित आहेत तर काही कर्तव्याच्या कथेशी संबंधित आहेत. हे प्रेम स्मारक केवळ आनंदाचीच नव्हे तर प्रेमातील दुःखद आणि चिरंतन प्रेमकथांची साक्ष देतात. आज आम्‍ही तुम्‍हाला देशातील अशाच ऐतिहासिक वास्तूंबद्दल सांगत आहोत, जे खर्‍या प्रेमाचे उदाहरण आहेत.

आग्राचा ताजमहाल Tajmahal

खऱ्या प्रेमाचे उदाहरण दिले जाते तेव्हा मुघल सम्राट शाहजहानने पत्नी मुमताजसाठी बांधलेला ताजमहाल आठवतो. तो देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. हे स्मारक शाहजहानने उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात 1631 ते 1648 दरम्यान बांधले होते. या थडग्यात मुमताज आणि त्यांच्या शेजारीच शाहजहान यांना दफन करण्यात आले. प्रेमाचे उदाहरण असलेल्या तहमहालचा जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

चित्तौडगड किल्ला chittorgarh

भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक असलेला चित्तौडगड किल्ला 7 व्या शतकात बांधला गेला. चित्तौडगड किल्ला राणी पद्मिनी आणि राजा रतन रावल सिंग यांच्या ऐतिहासिक प्रेमकथेचे प्रतीक आहे. राजा रतन सिंग यांनी अनेक परीक्षांनंतर राणी पद्मिनी यांना जिंकली होती. यानंतर तो त्यांना आपल्यासोबत चित्तौडगडला घेऊन आला. कमलकुंडाच्या काठावर बांधलेला तीन मजली प्राचीन पांढरी राणी पद्मावतीचा महाल हे स्मारकाचे मुख्य आकर्षण आहे. या किल्ल्याची शिल्पकला आणि वास्तुकला या दोन्ही गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात.

मस्तानी महाल

हा महाल महाराष्ट्रातील पुणे शहरात बांधला आहे. हा किल्ला पहिला बाजीराव आणि त्याची सुंदर दुसरी पत्नी मस्तानी यांचे घर आहे. पेशवा बाजीरावाच्या घराण्याने मस्तानी राणी स्वीकारण्यास नकार दिल्यावर बाजीरावांनी तिला शनिवारवाड्यात आणले आणि तिच्यासोबत येथे राहू लागले. आज ते घर शनिवारवाडा म्हणून ओळखले जाते. मात्र, आज हा वाडा अस्तित्वात नाही, फक्त त्याचे अवशेष आहेत.

रूपमती मंडप मध्य प्रदेश

हा किल्ला मध्य प्रदेशातील मांडू शहरात आहे. हा राजवाडा मांडूचा शेवटचा स्वतंत्र शासक सुलतान बाज बहादूर याने त्याची पत्नी राणी रूपमती हिच्यासाठी बांधला होता. जेव्हा राजा सुलतान बाजने राणी रूपमतीला लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा तिने एक अट घातली की राजाने असा महाल बांधावा जिथून तिला नर्मदा नदी पाहता येईल, तरच ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर राजाने हा महाल बांधला. नयनरम्य पठारावर वसलेला रुपमतीचा मंडप त्याच्या वारसा आणि ऐतिहासिक वास्तूसाठी प्रसिद्ध आहे.

Published by: Rahul Punde
First published: January 25, 2022, 2:34 PM IST

ताज्या बातम्या