Home /News /technology /

WFH आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, Zoom अ‍ॅपचं शुल्क आता भारतीय रुपयांमध्येही देता येणार

WFH आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, Zoom अ‍ॅपचं शुल्क आता भारतीय रुपयांमध्येही देता येणार

झूम हे अ‍ॅप (Zoom App) परदेशी चलनात व्यवहार करणारं अ‍ॅप होतं. पण आता हेच अ‍ॅप आजपासून भारतीय चलनात (INR) देखील त्यांचा व्यवहार सुरु करणार आहे.

    मुंबई,12 ऑक्टोबर: लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम (Work From Home during Lockdown)  ही संकल्पना संपूर्ण जगालाच लागू पडली आहे. व्हिडीओ कॉलद्वारे अनेक मीटिंग्स करण्यात आल्या. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सर्वांत उपयोगी पडलेलं अ‍ॅप म्हणजे Zoom अ‍ॅप. दरम्यान झूम हे अ‍ॅप परदेशी चलनात व्यवहार करणारं अ‍ॅप होतं. पण आता हेच अ‍ॅप आजपासून भारतीय चलनात देखील त्यांचा व्यवहार सुरु करणार आहे. त्यांचे अनेक प्रीमियम प्लॅन्स आता भारतीय चलनांत भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहेत. भारतीय आता त्यांच्या वापरानुसार मासिक आणि वार्षिक सेवा खरेदी करू शकतात. हे प्लॅन्स छोट्या टीम्ससाठी, छोट्या आणि मध्यम आकाराच्या बिझनेस टीमसाठी किंवा मोठ्या एंटरप्रायजेसाठी उपलब्ध होणार आहेत. वार्षिक प्लॅन 13,200 रुपयांपासून सुरू होऊन 17,700 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. (हे वाचा-आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीनंतर देखील भारतात सोन्याचांदीला झळाळी, वाचा नवे दर) प्रत्येक योजना ही युजर्स आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या टीम मेंबर्सवर आधारित राहणार आहे. उदाहरणार्थ लहान टीममधील मेंबर्ससाठी 13,200  रुपयांचा प्लॅन असेल.  या प्लॅनमध्ये 100 मेंबर्स सेवेचा वापर करू शकतील. त्यामध्ये 1GB क्लाउड रेकॉर्डिंग, सोशल मीडिया स्ट्रीमिंग आणि अनलिमिटेड  ग्रुप मिटिंग प्रति प्लॅनमध्ये उपलब्ध असणार आहे. मध्यम आणि छोट्या आकाराच्या बिझनेस ग्रृपसाठी जास्तीत जास्त 300 मेंबर्स असणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी सिंगल साइन ऑन, क्लाउड रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, तर मोठ्या बिझनेस गृपसाठी किंवा एंटरप्राइजेससाठी 17,700 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 500 पर्यंत लोक सहभाग घेऊ शकतात. त्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड क्लाउड रेकॉर्डिंग अशा सेवा अनेक आहेत. (हे वाचा-SBI अलर्ट! या तारखांना नाही वापरता येणार YONO SBI APP, बँकेने पाठवला मेसेज) झूम वेबिनासाठी सुद्धा कंपनीने त्यांचे प्लॅन्स जाहीर केले आहेत. दरवर्षी 100 जणांसाठी 1,23,700 रुपये, तर 5,733,700 रुपये प्रत्येक वर्षी 10,000 जणांसाठी द्यावे लागतील.  30,000 रुपयांत क्लाउड रेकॉर्डिंग, MP4, M4A फाईल्सची देवाण-घेवाण तसंच 3TB स्टोरेज प्रत्येक महिन्यात देण्यात आलं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Work from home

    पुढील बातम्या