मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Zomato चे सहसंस्थापक गौरव गुप्ता यांचा राजीनामा

Zomato चे सहसंस्थापक गौरव गुप्ता यांचा राजीनामा

2015 मध्ये गौरव गुप्ता झोमॅटोमध्ये सामिल झाले होते. झोमॅटो आयपीओच्या काळात गुंतवणुकदार आणि माध्यमांशी चर्चा करताना ते कंपनीचा चेहराच ठरले होते.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : ऑनलाईन फूड डिलीव्हरी अ‍ॅप (Online Food Delivery) Zomato चे सहसंस्थापक गौरव गुप्ता (Zomato Co founder Gaurav Gupta)  यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 2015 मध्ये गौरव गुप्ता झोमॅटोमध्ये सामिल झाले होते. त्यांची 2018 मध्ये Chief Operating Officer आणि 2019 मध्ये सहसंस्थापक म्हणून पदोन्नती झाली होती. Zomato IPO च्या काळात गुंतवणुकदार आणि माध्यमांशी चर्चा करताना ते कंपनीचा चेहराच ठरले होते.

मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, झोमॅटोने फूड डिलीव्हरीसह किराणा मालाची विक्रीही (Zomato Grocery Delivery) ऑनलाईन सुरू करण्यास सुरुवात होती होती. काही दिवसांपूर्वी झोमॅटोने किराणा मालाची डिलीव्हरी बंद करण्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोनेही या वृत्ताबाबत पुष्टी केली आहे.

झोमॅटोचे सहसंस्थापक दीपिंदर गोयल आणि गौरव गुप्ता यांच्यात काही काळापूर्वी मतभेद झाल्यानेही त्यांनी ही एक्झिट केल्याचं बोललं जात आहे. गौरव गुप्ता यांनी 6 वर्ष झोमॅटोमध्ये राहिल्यानंतर आता नवा चॅप्टर सुरू करणार असल्याचं मेलमध्ये सांगितलं आहे.

ZOMATO वरून होणारी किराणा मालाची DELIVERY बंद, तीन कारणांमुळे घेतला निर्णय

झोमॅटोला पुढे नेण्यासाठी एक उत्तम टीम आहे. परंतु माझ्या प्रवासात आता पुढील मार्ग काढण्याची वेळ आली आहे. हे लिहितानाही मी अतिशय भावूक होत असून कोणत्याही शब्दात माझ्या भावना मांडता येणार नसल्याचा, भावनिक मेल त्यांनी लिहिला असल्याचं कंपनीच्या ब्लॉगमध्ये सांगण्यात आलं आहे. Zomato ची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. कंपनीची मुख्य स्पर्धा Swiggy आणि Amazon शी आहे.

First published:

Tags: Zomato