मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

YouTubers Alert! आता अशा प्रकारचे VIDEO अपलोड करण्यासाठी सरकारचा नवा नियम

YouTubers Alert! आता अशा प्रकारचे VIDEO अपलोड करण्यासाठी सरकारचा नवा नियम

आता यूट्यूबर्सला आपल्या चॅनेलवर न्यूज आणि करंट अफेयर्ससंबंधी व्हिडीओ अपलोड करण्याआधी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आपल्या अकाउंटची माहिती द्यावी लागेल.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 5 डिसेंबर : YouTube वर अनेक युजर्स न्यूज आणि इतर चालू घडामोडी-करंट अफेयर्ससंबंधी व्हिडीओ अपलोड करत असतात. अशात आता यूट्यूबर्ससाठी कंपनीने नव्या नियम-अटी आणल्या आहेत. जारी केलेल्या नियमांनुसार, आता यूट्यूबर्सला आपल्या चॅनेलवर न्यूज आणि करंट अफेयर्ससंबंधी व्हिडीओ अपलोड करण्याआधी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आपल्या अकाउंटची माहिती द्यावी लागेल. यासाठी सरकारने 5 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. Digital Media प्लॅटफॉर्म्सवर सरकारची कठोर पावलं - डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्सबाबत सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. अशात केंद्र सरकारने अनावश्यक कंटेंट आणि अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने यासाठी 9 महिने आधीच इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी नियम 2021 (Indian Information Technology Rules 2021) आणला होता. या नियमांतर्गत डिजिटल मीडियाचे अनेक मीडियम कॅटेगराइज्ड केले गेले होते.

WhatsApp ने एका महिन्यात बंद केले 20 लाखांहून अधिक अकाउंट, पाहा काय आहे कारण

सरकारने 25 फेब्रुवारी 2021 रोजी यासंबंधी गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. या गाइडलाइन्समध्ये सरकारने 4 प्रकारचे प्लॅटफॉर्म्स सामिल केले होते. इंटरमीडिएरीज, सोशल मीडिया इंटरमीडिएरीज, सिग्निफिकेंट सोशल मीडिया इंटरमीडिएरीज आणि OTT प्लॅटफॉर्म्स सामिल असून यात YouTube Intermediaries अंतर्गत येतं.

अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्यांना झटका; Facebook ने आणलं हे नवं फीचर

YouTube Intermediaries म्हणजे काय? YouTube Intermediaries सर्विस एक अशी सर्विस आहे, जो यूट्यूबर्सच्या कंटेंटला ट्रान्समिट आणि पब्लिश करतो. परंतु त्यांचा News Media प्रमाणे त्या कंटेंटवर कोणताही एडिटोरियल कंट्रोल नसतो. हे इंटरमीडिएरीज तुमचे इंटरनेट सर्विस प्रोवायडर्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सही असू शकतात, जे तुमचा कंटेंट अपलोड करण्यासाठी, पोस्ट करण्यासाठी मंजुरी देतात. त्यामुळे यूट्यूबर्सने आपल्या चॅनेलची माहिती देणं आवश्यक असणार आहे.
First published:

Tags: Youtube, YouTube Channel, Youtubers

पुढील बातम्या