नवी दिल्ली, 30 जानेवारी : भारतात शॉर्ट व्हिडीओ मेकिंग App टिकटॉकवर (TikTok) बॅन आहे. तर दुसरीकडे युट्यूब (Youtube) शॉर्ट व्हिडीओ आणि लाईव्ह स्ट्रीमवर काम करत आहे. कंपनीने एक फीचर रोल आउट केलं आहे. जे युजर्सला व्हिडीओ आणि लाईव्ह स्ट्रीममधील मोमेंट्स कॅप्चर करण्यासाठी आणि शेअर करण्याची परवानगी देईल. या क्लिपची लांबी 5 ते 60 सेकंदच्या दरम्यान होऊ शकते आणि त्यासह एक नवा यूआरएल जोडलेला असेल.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युट्यूबवर क्लिप क्रिएटर कंटेंटमध्ये 5 ते 60 सेकंद सेगमेंटची निवड करण्याची परवानगी देतो, जो प्लॅटफॉर्मवर दुसऱ्यांसह शेअर केला जाऊ शकतो. युजर्स क्लिप कॉपी, एम्बेड, फेसबुक, ट्विटर किंवा रेडिट सारख्या सोशल मीडियाद्वारे पाठवू शकता. ही क्लिप ईमेलही करता येते आणि एका स्लायडरला खेचून क्लिपची लांबी सेट करता येते.
युट्यूबने दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा डेस्कटॉप आणि अँड्रॉईडवर उपलब्ध आहे. लवकरच ती आयओएसवर सुरू करण्यात येणार आहे.
सध्या ही सुविधा अल्फा टेस्टिंगमध्ये असून केवळ काही क्रिएटरसह उपलब्ध आहे. लवकरच सर्वासाठी युट्यूबवर हे फीचर उपलब्ध होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Youtube, YouTube Channel