Home /News /technology /

या युजर्ससाठी बंद होणार YouTube, वाचा काय होणार परिणाम

या युजर्ससाठी बंद होणार YouTube, वाचा काय होणार परिणाम

2016 मध्ये हे स्वस्त अँड्रॉइड गो स्मार्टफोनसाठी हे यूट्यूब अॅपचं हलकं वर्जन म्हणून लाँच करण्यात आलं होतं.

  नवी दिल्ली, 11 मे : स्वस्त फोनसाठी आलेलं YouTube Go App ऑगस्ट 2022 पासून बंद होणार आहे. 2016 मध्ये हे स्वस्त अँड्रॉइड गो स्मार्टफोनसाठी हे यूट्यूब अॅपचं हलकं वर्जन म्हणून लाँच करण्यात आलं होतं. जे आधीपासून यूट्यूब गो App चा (YouTube Go App) वापर करत आहेत, त्यांनी वेब ब्राउजरच्या माध्यमातून यूट्यूब वापरावं किंवा गुगल प्ले स्टोरवरुन मेन यूट्यूब इन्स्टॉल (YouTube) करुन ते वापरावं असं सांगण्यात आलं आहे. गो App अनिवार्य रुपात मुख्य यूट्यूबचं एक लाइट वर्जन होतं. लो-एंड अर्थात स्वस्त दरातील फोन चालवणं सोपं करण्यासाठी यूट्यूब गो अॅपने मुख्य अॅपचे अनेक फीचर्स दिले नव्हते. गो वर्जन अॅपने कमेंट करणं, पोस्ट करणं, कंटेंट क्रिएट करणं, डार्क थीमचा वापर करणं असे फीचर्स दिले नव्हते. 2016 मध्ये हे अॅप अशा क्षेत्रातील युजर्ससाठी लाँच करण्यात आलं होतं, जिथे कनेक्टिव्हिटी, डेटा किंमती आणि लो-एंड डिव्हाइसेससारख्या अनेक कारणांमुळे युजरचा एक्सपीरयन्स प्रभावित झाला होता. परंतु आता मात्र यूट्यूब गो अॅप बंद होणार आहे. अशात मेन यूट्यूब अॅपने आता कनेक्टिव्हिटी इश्यू असणाऱ्या लो-एंड डिव्हाइसेसमध्ये चांगल्या प्रकारे काम करण्याचा दावा केला आहे. यूट्यूब प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एंट्री लेव्हल डिव्हाइसेस किंवा स्लो नेटवर्कवर यूट्यूब पाहणाऱ्यांच्या स्थितीत सुधारणा केली आहे. तसंच यात अनेक अपडेट दिले जात आहेत. यूट्यूब गो अजूनगी ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे युजर्सला मुख्य अॅपमधअये अपग्रेड करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. किंवा मुख्य यूट्यूब वापरण्यासाठी चांगल्या फोनकडेही वळू शकतात.

  हे वाचा - काय सांगता! हातात फोन धरण्याच्या Style वरून उलगडेल तुमचं व्यक्तिमत्व; कसं ते वाचा

  तसंच यूट्यूब गोप्रमाणे, अँड्रॉइड गोदेखील आहे. हे स्मार्टफोनसाठीचं अँड्रॉइड लाइट वर्जन आहे. अँड्रॉइड गोचा उपयोग एंट्री लेवल स्मार्टफोनद्वारे केला जातो. त्यामुळे आता हेदेखील बंद केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Youtube, YouTube Channel

  पुढील बातम्या